समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

सिंधुदुर्ग वरील मराठ्यांचा पोर्तुगिजां विरुद्धचा रणसंग्राम

शिंदे कुळ हे महाराष्ट्रातील प्राचीन कुळ आहे. चालुक्यांन पासून शिलाहार राजांच्या काळापर्यंत त्याचे संदर्भ मिळतात.

पुढे १७व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा उद्योग हाती घेतल्यावर शिंदे कुळाने ही पिढ्यान पिढ्या रणांगणात रक्त सांडून स्वराज्याची सेवा केली. ती थेट मावळ चे खोरे ते लाहोर चा किल्ला.

स्वराज्याच्या सेवेस शिंदे कुळातील अनेक वीर कामी आले आहेत व अनेक शिंदे कुळी वीरांनी इनामे इतबारे सेवा ही केली आहे. त्यातीलच एक वीर म्हणजे सेनासाहिबसुभा येसाजी शिंदे होय.

१७३० साली वारणेच्या तहा द्वारे महाराष्ट्रात सातारा व कोल्हापूर ह्या दोन गाद्या अस्तित्वात आल्या.

व सिंधुदुर्ग हा महत्वाचा जलदुर्ग कोल्हापूर च्या गादी कडे आला. पुढे दुसरे समभाजी महाराज (कोल्हापूर गादि) ह्यांच्या काळात सिंधुदुर्ग किल्याचे किल्लेदार हे शिंदे कुळातील किल्लेदार येसाजी शिंदे हे असल्याचे पुरावे समोर आले आहेत.

येसाजी शिंदे हे १८ व्या शतकाच्या मध्यवर्ती कोल्हापूर राज्यात होऊन गेले एक शूर व्यक्तिमत्व. ते मूळचे तोरगेळ येथील होते. त्यांचे महत्व एव्हढ्यावरून अधोरेखित होते की “अज्ञापत्रातील शिवलंका असा उल्लेख असलेल्या व ८४ बंदरातील सर्वोत्तम स्थळ” असे गुरोवोद्गार ज्यांच्याबद्दल साक्षात शिवछत्रपतींच्या मुखातून निघाले त्या सिंधुदुर्ग व त्याभोवतालचा सम्पूर्ण सुभा त्यांच्या कडे होता . व त्यांनी पोर्तीगीजान विरुद्ध लढून सार्थ ही ठरवली होती. व दुसरी अधोरेखित करण्याची बाब म्हणजे त्यांना दस्ततुरखुद्द छत्रपतींनी सेनासाहिबसुभा हा किताब दिला होता. व छत्रपतींशी ते रक्ताच्या समबंधांनी बांधले गेले होते. त्यांची बहीन महाराणी जिजाबाई ह्यांचा विवाह १७२७ साली खुद्द छत्रपती समभाजी महाराज (राजाराम महाराज पुत्र – कोल्हापूर गादी) ह्यांच्याशी झाला होता. व त्यानि ही पुढे इतिहासात स्वकर्तबगरीने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

१७६३ मध्ये पावसाळ्या नन्तर गोव्याच्या पोर्तुगीजाननी सिंधुदुर्गावर सर्व ताक्तीनिशी हल्ला केला. पोर्तुगीजांनी हल्ल्याची वेळ अतिशय बिनचूक निवडली होती. कारण छत्रपती समभाजी महाराज ह्यांचा ३ वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता व राज्यावर नवीन दत्तकपुत्र विराजमान झाले होते. व त्यामुळे पेशव्यांचे व कोल्हापूर गादीचे नुकतेच दत्तक प्रकरणावरून वितुष्ट आले होते.व पेशवेनच्या नियंत्रणात सातारा चे मुख्य मराठा साम्राज्य नुकतेच कुठे पानिपत च्या हणीतून सावरत होते, पण पुन्हा पेशव्यांच्या घरगुती तंटे ( माधवराव पेशवे व राघोबा दादा) व परत निजामाची स्वारी ह्या सर्वांनी मराठे ग्रासले होते, त्यातच पोर्तुगीजांनि अचूक डाव साधला होता.

पण ह्या वेळेस त्यांची गाठ ही शिंदे कुलोतत्पन्न महावीर आशा सेनासाहिब सुभा येसाजींशी होती. त्या वेळचे गडावर मौजुद असलेल्या शिबंदिनीशी व सिंधुदुर्ग च्या समुद्रातील समयास पावत्या झालेल्या लढाऊ जहाजांच्या सहाय्याने त्यांनी पोर्तुगीजांच्या आधुनिक आरमारी शक्तीनशी समर्थपणे लढा दिला. त्यांनीं सिंधुदुर्ग मधील तोफखाण्याचा कल्पक व यशस्वी उपयोग करून पोर्तुगीजांचे पाचशे च्या वर लोक ठार केले. व अनेक जयबंदीही. येसाजीं शिंदेंनी किल्ल्यावरून सिंधुसागरातील मगर रुपी पोर्तुगीज जहाजांवर तोफगोळे असे काही बर्सवले की ह्या पोर्तुगीजांची लाल व पांढरी थोबाड तोफगोळ्यातून निघालेल्या आगीने व धुराने काळीकुट्ट पडली. त्यांचे प्रत्युत्तर एवढे तिखट होते की आपले नुकसान न सोसाऊंन लाल व पंढर्याची काळी झालेली थोबाड घेऊन व मान खाली घालून पोर्तुगीच आरमाराला आपले ध्येय अर्ध्यावरच टाकून पुन्हा रिकाम्या हाताने गोव्याकडे परत फिरावे लागले.

वीर येसाजी शिंदेंच्या ह्या भीमपराक्रमाची साक्ष – पुरावा म्हणजे त्याबद्दल महाराणी जिजाबाई (दुसरे समभाजी महाराज ह्यांची पत्नी – कोल्हापूर गादी)ह्यांनी किल्लेदार येसाजी शिंदे ह्यांना पत्र लिहून झालेल्या रणसंग्रामातील मिळवलेल्या विज्याबाबद्दल समाधान व्यक्त केले.

व पुढे त्यांच्या हातून सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक पवित्र अशी वास्तू ही बांधली गेली व ती वर्तमानात ही सुस्थितीत उभी आहे. ती म्हणजे *छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा’ असलेल्या जागेवर बांधलेली कोनाडा व गच्ची.* व त्यांनी त्या ठिकाणी महाराणी जिजाबाई ( दुसरे समभाजी महाराज ह्यांची पत्नी – कोल्हापूर गादी) ह्यांच्या आदेशाने रितसर निवेद्य व पूजा ही सुरू केली होती.

व विशेष महत्वाचे म्हणजे तसा आदेश असलेले पत्र छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांची पत्नी महाराणी जिजाबाई यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे सुभेदार येसाजी शिंदे यांना दिनांक २१ नोव्हेंबर १७६३ रोजी लिहिले ते पुढील प्रमाणे

श्री शंभू प्रा ||

श्री मन्माहाराज मातुश्री ——- आईसाहेब याणी चिरंजीव राजश्री येसाजी सिंदे सुभेदार यासी आज्ञा केली केली यैसीजे. सु|| आर्बा सितैन मया व अलफ. तुम्ही विनंतीपत्र पाठविले प्रविष्ट होऊन लेखनार्थ श्रवण जाहला. साहेबाची आज्ञा घेऊन निघालो ते गुरुवारी तडीस राहोन जंजिरातील कारभारी व नाइकवडी भृगुवारी येऊन जंजिरा घेऊन गेले म्हणोन लिहिले. त्यावरून संतोष जाहला. फिरंगी गोमंतकाहून आरमारसुद्धा येऊन जंजिरासी मातवर युध केले. साहेबाच्या सेवक लोकींही त्याचा मार सोसून आपणाकडील जंजिराकडील तोफानी मारगिरी करून पाचच्यारसेहे फिरंगी मारून नेस्तनाबूद केला. तन्मुले फिरंगी कांही लबडी (?) मार न सोसे यास्तव हतधैर्य होत्साता पलायेन संपादिले जंजिऱ्याच्या लोकास येश आले. मदुर्मिची सर्त जाहली. असा आकस्मात दंगा कधीही न जाहला. आणि या प्रमाणेंं गलिमाचे पारिपत्येही केले नाही. साहेबी दोनी हजार स्वर व पाच हजार हशम तयार करून खासा स्वारी सित्ध जाहाली. तो भवानजी कदम यासमागमे किलाची खुशालीची विनंती पत्रे आली. त्यावरून स्वारी तहकुब जाहली. पुढे फौजे रवाना केली आहे ती ही येऊन पावली असल. *तीर्थरूप कैलासवासी माहाराज राजश्री-छेत्रपती याचा हात (?) जंजिरा आहे त्याजवरी गची व कोनाडा बांधोन नैव्यद्य व पूजा चाले सारिखी करणे.* याविसी अंतर न करणे जाणिजे र|| छ १५ माहे जमादिलावल लेखन सीमा.
लेखन सीमा

पत्राचा आशय:-

दिनांक २१/११/१७६३

पोर्तुगीज आरमाराने जंजिरे सिंधुदुर्गावर कसा हल्ला केला. जंजिऱ्यातील शिबंदीने पोर्तुगीजांचा शौर्याने प्रतिकार करून चार पाचशे फिरंगी कसे ठार केले आणि मग फिरंगी कसे पळून गेले, तो वृत्तांत येसाजी शिंदे सुभेदार यांनी महाराणी जिजाबाई यांना कळविला होता. महाराणी जिजाबाई पत्रोत्ततरी येसाजी शिंदे सुभेदार यास कळवितात की, सिंधुदुर्गच्या कुमकेसाठी सैन्य तयार केले होते. परंतु फिरंगी पळून गेल्याने स्वारी तहकूब केली. जंजिऱ्यात कैलासवासी महाराज राजश्री छत्रपती यांचा हात आहे त्यावर गच्ची व कोनाडा बांधून नैवैद्य व पूजा चालू करावी अशी आज्ञा पत्रात करण्यात आलेली आहे.

वरील हे पत्र इतिहासातील दोन अतिशय महत्त्वाच्या घटनांची साक्ष आहे. ते म्हणजे

सिंधुदुर्ग चे किल्लेदार वीर येसाजी शिंदे ह्यांचा पोर्तुगीजांविरुद्ध केलेल्या विजयी लढाईतील भीमपराक्रम.

व सिंधुदुर्ग वरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या “उजव्या हाताच्या आणि डाव्या पायाचे ठशे” हे खरे असून त्या भावोती बांधलेली वास्तू कोणी व कधी बांधली.(त्याचा काळ)

खरेतर वरील पत्र बऱ्याच काळा पासून उजेडात आले आहे परंतु ह्या प्रस्तुत पत्राची दखल इतिहासकार व इतिहासप्रेमींनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या
“उजव्या हाताचे आणि डाव्या पायाचे ठशे” ह्या संदर्भातच घेतली व पत्राची दुसरी बाजू म्हणजे शिंदे कुलोतत्पन्न वीर सेनासाहिबसुभा येसाजी शिंदे ह्यांनी जवळ जवळ १५ व्या व १६ व्या शतकापासून सम्पूर्ण जगभरात समुद्रावर एकहाती वर्चस्व राखणाऱ्या पोर्तुगीजांना त्यांच्याच सोईस्कर अश्या रणक्षेत्रात म्हणजेच समुद्रातील लढाईत खडे चारले होते.

धन्य ते वीर येसाजी शिंदे

लेखक
रोहित शिंदे

पत्र माहिती व अनुवाद स्रोत
महाराष्ट्राची शोधयात्रा

संदर्भ

१) जिजाबाई कालीन कागदपत्रे(कोल्हापूर ची गादी):- पान क्रमांक १५७ आणि १५८, डॉ. आप्पासाहेब पवार. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

2 Comments

Narendra Ratnaparkhi – March 8, 2020

खुप छान माहिती, प्रयत्न पूर्वक इतीहासातील संदर्भासहित गोळा केली आहे, शिंदे घराण्याचे स्वराज्यात योगदान सर्वाना न्यात अहे, धन्य ते येसाजी…..

Shrutika Dumbre – March 8, 2020

खुप छान माहिती रोहित

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*