समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

शंभाजी महाराजांच्या सुटकेसाठी कृष्णभट्ट उर्फ आप्पाशास्त्री दीक्षित ह्यांचे बलिदान

महाशिवरात्री अवघ्या चार – पाच दिवसांवर आली होती. गावो गावच्या शिवालयात त्याची तयारी ही सुरू होती. परंतू बत्तीस शिराळा त्यास अपवाद होते. कारण गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या गावात एखादा माजलेला वळू शिरावा तशी एक मोगली तुकडी बत्तीस शिराळ्यात घुसली होती. कोणास ही मागमूस लागू न देता मोगलांनी शिराळ्याच्या कोटा जवळ पूर्ण छावणी न करताच मुक्काम टाकला होता.

तेथील ठाण्यात मराठा शिबंदी ही कायम असे, परंतू जेमतेमच.आजचा दिवस ही ह्या शिबंदीच्या संख्येस अपवाद न्हवता.

शिराळा तसे मोठे गाव. गावात समर्थांनी ११ मारुती पैकी एका मारुतीची स्थापना ही केली होती. आप्पासाहेब दीक्षित हे स्वराज्याचे अतिशय सावध अधिकारी त्या मंदिराची व्यवस्था व संपूर्ण परीसराचे धर्मकार्य ही बघत.

एव्हाना त्यांना मोघली छावणीची कुणकुण ही लागली होती. तसे लगोलग त्यांनी मराठा ठाण्यात माणूस पाठऊन त्यांस सावध करून स्वतःचा माणूस माग काढण्यास पुढे पाठवला.

आप्पा शास्त्रींची इशारत येताच ठाणेदाराने ही आपले हरहुन्नरी मावळ्यांचे पथक सज्ज केले. तिकडे वाड्यावर मात्र हेरा कडून खबर ऐकून स्वतः आप्पाशास्त्रीस वज्रघात झाल्यासारखे वाटू लागले. खबर च तशी धरणी कपं करणारी होती.

दस्तुरखुद्द छत्रपती शंभाजी महाराजांना कैद करून मुकररबखान पुढे कऱ्हाड ला गपचूप निघाला होता.
परतूं शिराळ्यात ही बातमी शेवटी फुटलीच.

खबर एकूण आप्पाशास्त्री व इतरांचा धीर सुटला होता.
आता असेच तडक जावे अन मुकररबखानास मातीत मीळऊन स्वराज्याच्या धन्यास सुखरूप परत आणावे अशा विचाराने त्या रांगड्या गड्यांचे बाहू स्फुरण चढू लागले होते. कारण विचार करावयास जास्त वेळ न्हवता.
कारण इतरांच्या मदतीस थांबलो व जर मुकररब इथून पुढे कऱ्हाड ला ओलांडून पूर्वेकडील मोघली प्रदेशात पुढे गेला तर उघड्या मैदानावर त्याला अंगावर घेणे जड जाईल. म्हणून जास्त विचार न करता आप्पाशास्त्री ठाणेदारला हाताशी धरत त्याचे पथक दिमतीला घेत गावातील काही लढाऊ लोक व स्वतः आप्पा शास्त्रीनीं स्थापन केलेल्या तालमीतले तगडे मल्ल घेऊन मुकररबखनाच्या गोटावर चालून गेले.

मोघलांच्या तुलनेने ह्यांची संख्या जरी अतिशय तोकडी असली तरी बत्तीस शिराळ्याची नैसर्गिक- भौगोलिक परिस्थिती ह्यांच्या सोबत होती.मोघली प्रदेशाच्या पश्चिमेस दुर्गम भागात असलेला बत्तीस शिराळा त्याच्या अवतीभोवती असलेल्या सह्याद्रीच्या आवरणाने गनिमी काव्यास अतिशय उपयुक्त होता.

तिकडे स्वराज्याचा कौस्तुभ मनी संगत असल्याने मुकररब खान पूर्ण सावध होता. त्याने घेतलेली झेप त्यास एक आकस्मित यश देऊन गेली होती. व हे यश अलगद बादशहाच्या झोळीत टाकण्यास तो कितीही आतुर असला तरीही बेफिकिरी मुळे क्षण भरात होत्याचे न्हवते ंहोऊ शकते हे तो जाणून होता. तसा हल्ला एक रात्र आधीच ज्योत्यजी त्यामुळे रात्रभर डोळ्यात तेल घालून पहारा देण्याचे आदेश त्याने मोघली हशमांस दिला होता.

परतूं आज ची काळरात्र अनेक गोष्टींचा निकाल लावणारी होती. ह्या रात्रीच्या उदरातून मराठे व मोघल दोघांचे भाग्य एकमेकांशी संघर्ष करत सूर्योदयाच्या किरणांबरोबर पुन्हा उजळण्यासाठी झटत होते. मात्र नियतीने दोघांपैकी एकाच्याच भाग्योदयास मंजुरी दिली होती. परंतू नियतीस काही केल्या आपल्या बाजूने कौल देण्यास भाग पाडायचेच ह्या इराद्यानेच आप्पाशास्त्रींनी कूच केली होती.

अप्पशास्त्री सोबत निघालेला शिराळ्यातील हा जमाव अक्षरश लालबुंद होऊन पुढे सरकत होता. कारण ही तसेच होते. एव्हाना मोघली पथक म्हंटले की उभा मराठा प्रदेश दात ओठ खात असे. कारण ती पथक लुटालुटीची कृत्ये ही तशी करत. परंतू आज त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. खुद्द स्वराज्यच्या छत्रपती वर हात टाकण्यापर्यंत ह्यांची मजल गेली होती. त्यामुळे आज काही करून ह्या मुकररबखानाचा माज उतरवायचाच. ह्यांच्या मगरमीठीतून शंभू राजांना सोडवायचे अथवा तिथेच कटुन मरायचे ह्या इराद्याने हा जमाव शिराळ्या च्या मंदिरातील आई भवानी ला स्मरून मुकररबखानावर कोसळला.

सुरवातीस अचानक झालेल्या हल्ल्याने मोघल थोडे फार बिथरले.पण ह्या आशा प्रकारास आपल्याला कधीही कुठेही सामोरे जावे लागू शकते. ह्याची मानसिक तयारी मुकररबखानाची असल्याने त्याने त्याची संपुर्ण छावणी लगेच लढाईस तयार केली.

अप्पाशास्त्रींच्या नेतृत्वात मराठ्यांनी अक्षरश गोंधळातील पोत जाळून नाचवावा तश्या नंग्या तलवारी हशमांच्या छातडावरून नाचवल्या. पंरतू आई भवाणीने यशाचे दार काही उघडले नाही. रात्रीच्या अंधारात भवानीला बळी रुपी नेवेद्य देण्यासाठी निघालेली ही भुते स्वतः च मोगली राक्षसांचे भक्ष्य झाली.

संख्येने जास्त असलेल्या मोगलांनी ह्या मोजक्या शिबंदीस जुमानले नाही. मराठ्यांचे प्रयत्न तोकडे पडले.
अनेक वीर गतप्राण होऊन शिराळ्याच्या त्या मातीत कायमचे मिळाले.उरलेले बरेच मराठे व स्वतः आपशास्त्री दीक्षित कैद झाले.

दिवस उजडताच पुढे जाण्याचा बेत असल्याने ह्या कैद केलेल्या मराठ्यांचा मुकररब ने त्या रातीतच निकाल लावण्याचा निश्चय केला.

त्याने बत्तीस शिराळ्याच्या त्या माळवरच रात्रीच्या अंधारात आप्पा शास्त्री दीक्षित सह इतर सर्व कैद मराठा तुकडीचा शिरच्छेद करण्याचा निर्णय घेतला.

शेवटी अशाप्रकारे महाशिवरात्रीच्या त्या चार पाच रोज आधीच बत्तीस शिराळ्यात आप्पा शास्त्री व त्याच्या साथीदारांनी शंभुराजेंच्या सुटकेसाठी स्वराज्याच्या शिवपिंडीवर आपली बेलाच्या पान रुपी शिरकमले अर्पण केली.

मात्र कागदोपत्री कोणताच पुरावा नसल्याने इतिहासाच्या पानांनी ह्या वीरांस सामावून घेतले नाही.

परंतू तरीही बत्तीस शिराळ्यातील मल्लशाळा, भवानी मंदिर, मारुती मंदिर व स्वामीकार्यास कामी आल्याने अप्पशास्त्रीच्या वनशजांना मौजे कणदूर येथील इनाम रुपी मिळालेली जमीन ह्याची साक्ष देते.

समाप्त

लेखक
रोहित शिंदे

संदर्भ
मराठेशाहीचे अंतररंग
खरे जंत्री

टीप –
कुळकायदा अमलात येसपावतो ही इनामी जमीन दीक्षितांच्या सध्याच्या पिढीच्या ताब्यात होती.

व खरे जंत्री वरून १६८९ च्या महाशिवरात्रीची तारीख ८ फेब्रुवारी १६८९ येते. व वरील माहितीतील हल्ला महाशिवरात्रीच्या ४-५ दिवस आधी झाल्याने म्हणजेच ३ -४ फेब्रुवारी १६८९ ही तारीख शंभाजी महाराजांच्या अटकेच्या आसपास असल्याने त्यास जुळून येते.

पोस्ट खाली दिलेले चित्र हे काल्पनिक असुन आंतरजालावरून घेतले आहे.

लेख आवडल्यास कृपया शेअर करावा व आपला अपरिचित इतिहास सर्वांसमोर पोहचविण्याचा कार्यास हातभार लावावा

लेख पूर्ण वाचवा व वाचून झाल्यास कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.

1 Comment

विक्रम जयसिंग देसाई – April 11, 2020

खूप छान माहीत दिलीत🙏👍धन्यवाद

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*