समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

आज चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती व शिवपुण्यतिथी चा दिवस

आज चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती व शिवपुण्यतिथी चा दिवस
आजच्या दिवशीच भगवान हनुमानाचा (मारुतीराया) चा जन्म झाला. हा दिवस सबंध हिंदुस्तानात हनुमान जयंती म्हणून साजरा होतो. परंतू मराठ्यांच्या इतिहासात किंबहुना हिंदुस्तानच्या इतिहासात हा दिवस एक वेगळ्या कारणाने नोंदवला गेला आहे. ते म्हणजे शिवछत्रपतींची पुण्यतिथी. आजच्याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमा शालिवाहन शके १६०२// राज्यभिषेक शके ६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यास व तमाम म्हराठी रयतेस पोरके करून स्वर्गरोहनास निघून गेले.
जाताना महाराज स्वराज्याचा हा प्रचंड प्रपंच मागे ठेऊन गेले. तो प्रपंच म्हणजे नक्की काय? हे आपण संख्या स्वरूपात पाहूया.

म्हंजेज थोडक्यात स्वराज्याचा ताळेबंद पाहूया –
स्वराज्यातील एकूण गडकोट किती? त्यातील शिव छत्रपतींनी बांधलेले कोणते व महाराष्ट्रातले व कर्नाटक मधील कोणकोणते, स्वराज्यातील सेना, सरदार किती व कोण, सुभ्याचे सुभेदार कोण, स्वराज्याचा मुलुख कोठून कोठपर्यंत, स्वराज्याचे धन(द्रव्य स्वरूप), इतर चीजवस्तू. स्वराज्याचे एकूण उत्पन्न
इत्यादी सर्व संख्या रुपात पाहूया.

सुरवात
स्वराज्याची सीमा –
महाराजांच्या मृत्यू समयी स्वराज्यात साल्हेर गड पासून गोदावरी नदीच्या अलीकडे कुलदेश, वरघाट, तळघाट ते तुंगभद्रा नदीपर्यंत एक प्रांत (देशावरील स्वराज्य)
तर तुंगभद्रा नदी पासून दक्षिणेकडे कावेरी नदी पर्यंतच्या प्रदेशातील कोलार, बाळापूर, येलूर, ह्ये प्रदेश होते. (कर्नाटक प्रांत)
वरील प्रदेशाचे मुलकी प्रशाशन हे खालील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते .
मोरोपंत पिंगळे ( पेशवे) – उत्तर कोकण, साल्हेर ते पुणे (देशावरील प्रदेश)
अण्णाजी दत्तो (सुरणविस, सचिव) – दक्षिण कोकण, सावंतवाडी, कारवार चा उत्तर किनारा,
दत्तोजी पंत वाकनविस – सातारा,कोल्हापूर, तुंगभद्रा नदी पर्यंतचा प्रदेश, कर्नाटक प्रांताचा काही भाग, कोप्पळ
रघुनाथ पंत हनुमंते – कर्नाटक चा प्रांत
आता ह्या सबंध प्रदेशातील सुभे आपण पाहूया
स्वराज्याचे मुलकी – महसूल विभाग – २९
पुणे – वाई, मावळ, सातारा, कराड, खटाव, माणदेश, मलकापूर, तारळे, पन्हाळा, आजरा, जुन्नर, कोल्हापूर, रामगड, भीमगड, भिवंडी, कल्याण, महाड, जावळी, राजापूर, कोळे, कुडाळ, बेळगाव, लक्षमेश्वर, गदग, कोप्पळ, हल्लाळ, संपगाव, भुंजगगड, नवलगुंद

आता आपण ह्या सबंध दक्षिण पठारावर विस्तार पावलेल्या स्वराज्याचे उत्त्पन्न पाहू.

स्वराज्याचे एकूण वार्षिक उत्पन्न –
खालील आकडे पातशाही होणात दिले आहेत. पातशाही होणाचा विनिमय दर –
प्रत्येकी पातशाही होंन – ३ रुपये, ७५ पैशे
( पावणेचार रुपये )
तळकोकण (१३ सुभे) – १ कोटी, ४२ लाख पातशाही होंन
वरघाट (८ सुभे) – ७ लाख २५ हजार पातशाही होंन
देश – १५ लाख ७५ हजार
एकूण – १ कोटी ६५ लाख पातशाही होंन
विनिमय दर प्रत्येकी पातशाही होंन – ३ रुपये, ७५ पैशे
( पावणेचार रुपये)
वरील यादीत बारामती, इंदापूर व जुन्नर च्या १३ तराफांचे आकडे नाहीत, त्यामुळे हे उत्पन्नाचे आकडे, अपूर्ण आहेत.
स्वराज्याची सीमा, त्याचे मुलकी विभाग व उत्पन्न नन्तर आता ह्या सर्व प्रांतातील गड आपण तपशीलवार पाहूया.
१६८० साली स्वराज्यातील (महाराष्ट्र) गड कोट, शिवछत्रपतींनी जिंकलेले. – ४९ गड
सिंहगड, येलबगी गड, घनगड, रांगणा, लिंगाणा, मानगड, जयगड, लोहगड, फोंडा, लावड, रसाळगड, हडसर, केचर, सातारागड (अजिंक्यतारा), परळी चा गड (सज्जनगड), वल्लभगड, जवळेगड हरुषगड, मंदरगड, सलोभागड, मदगिरी गड, रोहिडा, जीवधन, मंगळूर चा कोट, कोपलगड, कुशटगी गड, पन्हाळगड, नौबतगड, सुपे चा कोट, पुरंदर, अचलगिरीगड, सरसगड, सुधागड, अंकोले चा कोट, पांडवगड, वंदनगड, शिवेशवर चा कोट, विशाळगड, त्रियम्बकगड, शिवेशवर कोट, हलीयाळ कोट, बहादूर गड, साल्हेर, मनोहरगड, अहिवंत गड, माहुली, ठाकरीगड, प्रसन्नगड, तानवडा गड

स्वराज्याचा दुसरा भाग म्हणजेच कर्नाटक प्रांतातील जिंकलेले गड – ७९
वरघाटातील येथील गड ( कोल्हार, बाळापूर प्रांत ) – ३८
कोल्हार, नंदीगड, चंदनगड, ब्रम्हगड, वर्धनगड, गणेशगड, वज्र्यगड, मर्दनगड, बिदनूर कोट, भास्करगड, प्रकाशगड, ढमकुरकोट, कोलार-कदमकोट, दुर्गमगड, भीमगड, सरसगड, अहिनीजादुर्ग, कट्टरगड, मकरंदगड, बुरवगड, सोमशंकरगड, हातमलगड, भूमंडनगड, मेज मल्हारगड महिपाल गड, बुंदीकोट, कपशेरी, एलूर कोट, कैलाश गड, महिमंडन गड, अर्जुनगड, अर्काट गड, परविड गड, भंजनगड, राजगड – चंदी (जिंजी), मदोनम्त गड – चंदी (जिंजी) मुखनेगड, भातुर, पालेकोट,
वरघाटाखालील गडकोट – ४१
पतनगदने गड, जगदेवगड, केवळगड, गगनगड, मदगड, कस्तुरीगड, रत्नगड, प्रबळगड, मार्टेरगड (ट च्या जागी त आहे), कृष्णगिरी, शारंगगड, लागगड, त्रीचंदी कोट, सुदर्शनगड, महाराज गड, कृष्णगिरी गड, रंजनगड,शिदगड, मल्लकाअर्जुनगड, प्रांनगड, कुंजरगड, आरकोटगड,कर्नाटक गड, बिगेवाळूंगड, बहिरव गड, सुमाकोट,त्रिकुळूर कोट, वेटवल गड, विशाळगड,त्रिमल कोट, चेलगड, गर्वगड, देवना कोट, रामगड, चिंताहर कोट, वुघाचल कोट, चविकोट, निलसाजिन गड, यशवंत गड, देवगड, मनगड
असे हे कर्नाटक प्रांतातील एकूण ७९ गड होत.

वर आपण महाराजांनी महाराष्ट्रातील व कर्नाटक प्रांतातील जिंकलेले गड पाहिले, ह्या जिंकलेल्या एकूण गडांची संख्या दोन्ही प्रांत मिळून अदमासे – १२८ होते.
आता आपण महाराजांनी स्वतः बांधलेले, वसवले, डागडुजी केलेले गड पाहूया.

महाराजांनी बांधलेले एकूण गड खालील प्रमाणे – १०८
राजगड (माची), प्रचंदगड (तोरणा), केळजा, वैराटगड, कमळगड, वर्धनगड, प्रतापगड, मंगळगड, गहननगड, पताकागड, पद्य गड, सुबकर गड, सबलगड, बहीरवगड, गगनगड, सारंग गड, सुरगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, पावनगड, पारगड, भिवगड, भुधरगड, राजगड, सहनगड, नाकडगड ,लोनाजगड, काचनागड, सिदीचागड, वसंतगड, सुंदरगड,महिमान गड, मचद्रगड, व्यंकटगड, कलौल गड, कोथळगड, श्रीवर्धनगड, कमर गड, व्याघर गड(वासोटा), खोलगड, प्रचितगड, प्रौढगड, वनगड, नरगुंद गड, राम दुर्ग, बालेराजा, अंजनवेली, सरगड, मुरगड, श्रीमंतगड, गजेंद्रगड, येळूर कोट, कणकाड्री गड, रवळा गड, नाचना गड, रामसेजगड, रुद्रमाळ गड, समानगड, वल्लभगड, महिपाल गड, मवोर गड, महिपतगड, मदनगड, कंगोरीगड, वारुगड, पटगड, सोनगड, कुंजरगड, तुंग गड, भूषणगड, बोटगीर कोट, कंबल गड, मंगलगड, स्वरूपगड, ढोलगड, मनरंजनगड, बहुलगड, महेंद्रगड, रजेगड, बळवंत गड, श्रीगलडव गड, पवित्र गड, कलानीधी गड, गंधर्वगड, सुमनगड, गंभिर गड, मंदर गड, मर्दनगड, दहीगड, मोहनगड,गडागड, घोसाळगड, तिकोना गड, सुवर्णदुर्ग, रत्नागिरी, राजकोट, सेवनागड, सेवकगड, कहोज गड, कठोरगड, भास्कर गड, कपलगड, हरिषचन्द्रगड, मंडणगड, कुलाबा दुर्ग, सिध्दगड.

वरील गडाच्या बंधकाम यादीत काही गड हे अदीच अस्तित्वात होते, त महाराजांनी ताब्यात घेऊन / जिंकून तिथे बांधकाम केले. तर ते गड जिंकलेल्या यादीत ही येऊ शकतात.
आशा प्रकारे महाराजांच्या निधना समयी देशावर ( महाराष्ट्र) ४९ गड, कर्नाटक प्रांतात ७९ व व स्वतः महाराजांनी बांधलेले १०८ असे – २३६ गड स्वराज्यात होते.
सभासद बखर मध्ये हया बाबत नोंद करताना देशावर जिंकलेले ५० गड अशी नोंद आहे परंतु नावा सकट यादी देताना मात्र ४९ गडांचीच नावे देतो. नवीन वसवलेल्या गडांबाबत ही नोंद १११ अशी आहे, परंतू यादी मात्र १०८ गडांची आहे. म्हणजे सभासद बखर मध्ये एकूण संख्या २४० अशी नोंद आहे मात्र यादी २३६ गडांचीच आहे.

आता आपण स्वराज्याचे सेंन्य बळ व त्याचे सरदार ह्याची माहिती घेऊ. महाराजांच्या मृत्यू समयी स्वराज्याचे सेंन्य जवळ जवळ दोन लाख पाच हजार पर्यंत पोहचले होते. त्याची फोड पुढील प्रमाणे.
घोडदळ – एक लाख पाच हजार
पायदळ – एक लाख
घोडदळाची फोड –
बारगीर – पंचेचाळीस हजार ( बरगीर म्हणजे – घोडेस्वारास सरकार तर्फे दिला जाणारा घोडा)
शिलेदार – साठ हजार (शिलेदार – घोडेस्वारचा स्वतः च्या मालकीचा घोडा, मोहिमे दरम्यान हयचा खर्च सरकारातून न करता, व्यक्तिगत मालका तर्फे केला जाई.

आता आपण घोडेस्वारां पैकी बरगीर फौजे वर असलेले सुभेदार पाहू.
स्वराज्यच्या बरगीर फौजे वरील सुभेदार – २९
हंबीरराव मोहिते (सरनौबत), संताजी घोरपडे, मानाजी मोरे, येसाजी काटकर, संताजी जगताप, निबाजी पाटोळे, जेतोजी काटकर, परसोजी भोसले, गणोजी शिर्के, बाळोजी काटकर, निळोजी काटे, नेतोजी पालकर, तुकोजी निंबाळकर, गोंदजी जगताप, शंभाजी हंबीरराव, धनाजी जाधव, शामाखान, वाघोजी शिर्के, हरजी निंबाळकर, भवानराव, आंनद राव हशमहाजारी, तेलंग राव, रुपाजी भोसले, व्यंकट राऊ खांडकर, खंडोजी जगताप, उदाजी पवार, रामजी काकडे, कृष्णाजी घाडगे, सावजी महितें.

स्वराज्यच्या शिलेदार फौजे वरील सुभेदार –
नागोजी बल्लाळ, गणेश शिवदेव, चांदो हिरदेव, नेमाजी शिंदे, रामजी भास्कर, बायाजी गडदरे, बाळाजी नीळकंठ हिरोजी शेळके, त्रिंबक विठ्ठल, महादजी नारायण, बळोजी शिवतरे, जाणराव वाघमारे, संकोजी माने,अमरोजी पांढरे, रामजी जनादने, मुधोजी थोरात, कृष्णाजी भांदडे, बहिर्जी वाडदरे, चंदो नारायण, खेमनी, खंडोजी आटोळे, राघो बल्लाळ, बळवंतराव देवकाते,बहिर्जी घोरपडे, मालोजी थोरात, बाळाजी बहीरव, देवाजी उघडे, गणेश देवकाते,केरोजी पवार, उचाले, नरसोजी शितोळे,

पायदळातील फौज वरील सुभेदार – एकूण ३६
येसाजी कंक (सरनौबत – पायदळ), सूर्याजी मालुसरे,गणोजी दरेकर, मुगबाजी बेनमना,माल सांवत, विठोजी लाड, इंद्रोजी गावडे, जावजी महानलाग, नागोजी प्रहलाद, पिलाजी गोळे, मुधोजी सोनदेव, कृष्णाजी भास्कर, कलघोडे, हिरोजी मराठे, रामाजी मोरे, हिरोजी भालदार, तुकोजी कडू, राम दळवी, दत्ताजी लकर, पिलाजी सणस, जावजी पाये, भिकजी दळवी, कोंडजी वडखले, त्रिंबकजी प्रभु, कोंडाजी फर्जंद, तानाजी तंदुसकर, तानसावंत मावळे, महादजी फर्जंद, येसाजी दरेकर, बाळाजीराव दरेकर, सोन दळवे, चांगोजी कडू, कोंडाळकर,ढवळेकर, तानसावंत भोसले.

आशा प्रकारे आपण स्वराज्यातील सेंन्यबळ व त्याचे अधिकारी पाहिले. वरील यादीतील अधिकारी हे पंचहजारी व हजारी असे मिश्रित आशु शकतात.एकूण सेंन्य बळ व अधिकारी संख्या पाहता ह्या यादीतील नोंदी ह्या नक्कीच अपूर्ण आहेत. एवढे मात्र खरं.
ह्या व्यतिरीक्त स्वराज्यात हत्ती व त्यांचे बछडे निघून १२६० असल्याची नोंद ही मिळते. व त्याच बरोबर आरमाराचे दोन सुभे व प्रत्येक सुभ्यात २०० जहाजांचा तांडा होता. त्याव्यतिरिक्त तोफची (तोफखाना), बंदुकीची ही स्वराज्यात होते.

ह्याच्या व्यतिरिक्त शंभाजी महाराजांच्या राज्यभिषेक वेळी राजधानी दुर्गेशवर रायगडावर वस्तूंची, व जनावरांची मोजदाद झाली, त्याद्वारे राजधानी वरील काही शस्त्रांची संख्या ही आपणास कळते. ती पुढील प्रमाणे.
उंट – ३००० मग
गायी १००० नग
बैल ५००० नग
म्हशी – ५००० नग
मेंढ्या – १००० नग

वरील यादीत आपण सेंन्य संख्या व सुभेदाताची नावे पहिली, आता आपण मुलकी – व महसुली प्रशशनातील काही निवडक अधिकारी ह्यांची नावे व त्यांचे नियुक्ती असलेले प्रांत पाहूया.

सातारा प्रदेशातील हवालदार –
येसाजी राम – निंब – इ.स. १६७६
आमजी कान्हो – हवेली – इ.स. १६७६
भिमाजी मल्हार – कोरेगाव – इ.स. १६७६
कुकाजी बयाजी – सातारा – इ.स. १६७५
महादजी अनंत – सातारा इ.स. १६७६
तुकाजी प्रभू – सातारा – इ.स. १६७७
सज्जनगडावरील (परळी) मुद्राधारी (हवालदार)
जिजोजी काटकर – इ.स. १६७६, इ.स. १६८२
मकाजी काटकर – इ.स. १६८९
बऱ्हानजी मोहिते – इ.स. १६९२ , इ.स. १६९९,
गिर्जोजी भोसले – इ.स. १७०८, इ.स. १७०९
येसाजी जाधव – इ.स. १७०९
सटवाजी दावल – इ.स. १७१२
काही निवडक प्रांताचे सुभेदार व त्यांचा कार्यकाळ

वाई प्रांत –
येसाजी मल्हार – इ.स. १६७६, १६७९, १६८७, १६९०, १६९६,
अनाजी जनार्दन – इ.स. १६९७

जावळी प्रांत –
विरोराम – इ.स. १६६४
विठ्ठल दत्तो – इ.स. १६७१ – इ.स. १६७२
अंबाजी मोरदेव – इ.स. १६७६
गोपाल रायाजी – इ.स. १६७७
काशी रंगनाथ – इ.स. १६८०
महादजी शामराव – १७०६ – १७०८

मावळ प्रांत –
महादजी शामराव – काळ अज्ञात

कोल्हापूर प्रांत –
गणेश जगदेव – इ.स. १६७२
व्यंकोजी रुद्र – इ.स. १६७७

पुणे प्रांत –
त्र्यंबक गोपाळ – इ.स. १६७९
विनायक उमाजी – इ.स. १६८१
बाळाजी विषवनाथ भट – १६९९ – इ.स. १७०४

सातारा प्रांत –
अंबाजी मोरदेव – इ.स. १६८३ ते १६८५
महादजी शामराव – काळ अज्ञात

वरील सर्व माहितीत आपण स्वराज्याचे मनुष्यबळ, उत्त्पन्न,विस्तार ह्याची माहिती पहिली. आता आपण राजधानी दुर्गेशवर रायगड वरील संपत्ती पाहूया
संपत्ती स्वरूप – शस्त्र, द्रव्य,धान्य, जवाहिर, इतर चीज वस्तू

राजधानी दुर्गेशवर रायगड वरील शस्त्रास्त्रे
तलवार – ३०० नग, खांडा – २०० नग, एति – ६०० नग, भाले – ४००० नग, जमदाड – १००० नग, पट्टा – १००० नग, ढाल – १३०० नग,छर्रे – ११०० नग, बाण – ४००० भाते, चिलखत – ४००० नग, छत (चामड्याचे साधारण चिलखत) – ११०० नग, बनेती (लाकडी टोकदार काठी) – ५००० नग, शिरस्त्राण – ४००० नग, कुऱ्हाडी – ३००० नग, कुदळ – ११०० नग, थाप्या ३००० नग, करवत ५००० नग, दारू (तोफेची) – २००००० खंडी, तोफेचे गोळे – १००००० नग,

लष्करी छावणी स उपयोगी इतर वस्तू
पालखी – ३००० नग, छत्री – १२००० नग,पोहरे – १५०० नग, कापूस – ७००० खंडी, मेन १३००खंडी,राळ १०००- खंडी, ढोल – ६०० नग,नगारे १२०० नग, तुताऱ्या – ८००० नग.
वरील सर्व यादीत आत्तापर्यंत आपण स्वराज्याचे एकूण लष्करी बळ व त्याचा विस्तार पहिला. आता आपण स्वराज्याचे आर्थिक बळ पाहू. छत्रपतींच्या मृत्यू वेळी स्वराजयचे आर्थिक संपत्ति किती होती. ह्याचा तपशील घेऊ.

रायगडावरील यादी.
द्रव्य रुपी खजिना (नाणे – चलन)
खालील यादी ही वेगवेळ्या ३८ प्रकारच्या मिश्र चलन व धातूंची आहे. ह्यातील ३२ प्रकारचे चलन (नाणी) हे सुवर्णाचे(सोन्याचे) होते. तर उरलेले इतर ६ चलन (नाणी) ही चांदी ची होती.
यादी खालील प्रमाणे – (मिश्र)
होन – ५ लाख, गंबार – एक लाख, मोहरा – दोन लाख, पुतळ्या – ३ लाख, पातशाही होन – १३,६४,४२५/-, सतलाम्या – १ लाख, इमराम्या – १ लाख, शिवराई होन – ४ लाख, कावेरीपाक होन – १५ लाख, सनगरी होंन – १२,७४,६५३/-, अत्युचराई होंन – २,५४,०३०/-, देवराई होन -३,००,४५०/-, रामचंद्राई होन – १,००,४००/-,
गुती होन – १ लाख, धारवाडी – २ लाख होन, प्रलखटी होन – २ लाख,पाक व नाईक होन – १ लाख, अदवाणी होन – ३ लाख, जडमाल होन – ५ लाख, ताडपत्री होन – १४ हजार, येळूरी होन – ५ लाख, निशाणी होन – ५० हजारी, रुपये – ५ लाख, अशरपी – २ लाख, अबाशा – १० लाख, दाभोळी कबरी – २५ लाख, चुली कबरी – १० लाख, बासरी कबरी – ५ लाख,
वेगवेगळ्या ५४ गडांवरील हुंडी स्वरूपात रक्कम – ३० लाख होन
वेगवेळ्या सुभेदारांना दिलेलं कर्ज – ३ लाख होन
फलम नाणे – ३ लाख, गड, व सेंन्य अधिकारी ह्याच्या यादी प्रमाणे

वरील यादीतील नाण्याची संख्या देऊनही त्याची बेरीज करून हिठे दिलेली नाही कारण प्रत्येक नाण्यांचा विनिमय दर म्हणजे बाजारातील किंमत वेगळी होती. त्यामुळे त्याची बेरीज करून अमुक एक आकडा काढणे चुकीचे आहे.
उदा. दाखल आता आपण ह्या यादीतील काही नाण्यांचा विनिमय दर पाहू
वरील यादीतील गंबार, ह्या नाण्याचा विनिमय दर हा तीन रुपये,बारा आणे,सहा पैशे होता.
मोहर ह्या नाण्या दर दोन रुपये, तर पुतळी ह्या नाण्यांचा विनिमय दर हा ३ ते ४ रुपये होता.
ह्या यादीतील फनम नाण्यांचा विनिमय दर हा ११ फनम नाण्यास ४ रुपये होता.
यादीतील आबशा (आबशी) ह्या नाण्याचा विनिमय दर हा एका आबशी नाण्यास १६ पैशे होता.
यादीत कबरी नावाचे काही नानी आले आहे,
(दाभोळी कबरी, बसरी कबरी, चुली कबरी) ह्या नाण्यांचा विनिमय दर ६० पैशे, ते १०० पैशे होता.
फनम च्या पोटप्रकारातील अफरजी (आफ्राजी) ह्या नाण्याचा विनिमय दर एका नाण्यास १० रुपये होता.
यादीतील काही नान्यांचा उपलब्ध विनिमय दर पाहिल्यांनातर ह्या नाण्यांबद्दल आपण थोडी माहिती घेऊया.
वरील नाण्यांच्या यादीतील
रुपये,अशरफी, आबशी,दाभोळी काबरी, चाऊली काबरी, बझरी काबरी ही नाणी चांदीची होती.
यादीतील कबरी हे मुळात चांदीचे नाणे असून लारी ह्या शिवकालीन नाण्याचा पर्यायी शब्द होता. हे नाणे शिवाजी महाराज व विजापूर चे शाशक ह्या दोघांनी ही सुरू केले होते.
वरील यादीत ताडपत्री होन हे नाणे आले आहे. हे दक्षिणेतील ताडपत्री (समकालीन जिल्ह्याचे ठिकाण) प्रेदशात वापरले जात असे. ताडपत्री नावाचा प्रदेश पूर्वी अस्तित्वात होता.
वरील यादीतील अत्युचराई, देवराई, रामचंद्रराई, शिवराई ही नाणी विजयनगर साम्राज्याचे शाशकांनी त्यांच्या काळात सुरू केली होती.
तर यादीतील कावेरी पाक, सनगरी, गुती होन, धारवाडी, आदवाणी, चंदावरी, वेळूरी, रामनाथ पुरी, इत्यादी होन (सुवर्ण नाणी) ही सर्व मूळ होन च आहेत. परंतू त्यांना जी नावे पडली ती टंकसाळ मुळे म्हणजे कावेरी पाक येथील टंकसाळ मधून बाहेर पडणारी नाणी ही कावेरी पाक होंन म्हणून ओळखली जाऊ लागली. गुती, धारवाडी व इतर नाण्यांचे ही तेच आहे.

यादीतील फनम नाणे यांचे पोट प्रकार –
अफरजी,त्रिवाळूरी, त्रिसुळी, चंदवरी, बिलधारी, उलफकरी, महमदशाई, वेळूरी, कटेराई, देवजवळी, रामनाथपुरी, कुनगोटी.
वरती फनम नाणे व त्याचे पोटप्रकार दिले आहेत. हे फनम नाणे (सुवर्ण) दक्षिण भारतात चालत असे.
शिवकळं नंतर हे नाणे चांदी व हिणकस सोन्यात ही पाडण्यात आले.
ह्या फनम नाण्याच्या पोटप्रकारातील कटेराई हे नाणे दक्षिणेतील म्हैसूर च्या राज्याचे होते.
ह्या फनम नान्यातील त्रिसूळी नाणे ह्या वर त्रिशूळाचे चिन्ह असे.
व फनम च्या पोटप्रकारातील अफरजी (आफ्राजी) हे नाणे बादशाह अकबर ह्याचे आफताबी हे सुवर्ण नाणे असावे अशी शक्यता आहे.
यादीतील आबशा (आबशी) हे नाणे चांदीचे असून सुरत व कलीकत बंदरात जास्त वापरले जाई. हे मूळचे इराण चे नाणे असून इराण चा शहा अब्बास (द्वितीय) ह्याने सुरू केले होते.
यादीतील इब्राहिमी नाणे हे सुद्धा इराण चेच होते. हे नाणे भारताच्या पश्चिम बंदरात चलनात होते.
नाण्यांची यादी पाहिल्यावर आता आपण राजधानी दुर्गेशवर रायगड वरील जड जवाहिर ह्यांची यादी पाहूया.
नाण्याची यादी पाहिल्यावर आता आपण पुढे जाऊया.

आपली समपत्ती ही केवळ द्रव्य स्वरूपातच न मोजता, वस्तूस्वरूपात मोजणे व संग्रह करून ठेवणे हे प्राचीन काळी पासून चालत आलेली पद्धत. नाण्यांचा वापर सुरू होतां पूर्वी विनिमय साठी वस्तू व धान्य च वापरले जाई.
त्यास अनुसरूनच आता आपण राजधानी वरील इतर समान सुमन , धान्य ह्याची वजन – माप सकट यादी पाहूया.
खालील वस्तूंची माप हे पुणेरी खंडी ह्या वजन मापात दिले आहे.

पुणेरी खंडी ची फोड –
१ पुणेरी खंडी – २० पुणेरी मण
१ पुणेरी मण – १२.५ किलो
म्हणजे १ खंडी (पुणेरी) २५० किलो.
वरील फोडीतून आपणास खालील यादीतील वजनाचा अंदाज बांधता येऊ शकतो.
(हा केवळ अंदाज आहे, पुरावा नाही)

रायगडावरील सोने चांदी व इतर धातू –
सोने – ४ नळी, ९ खंडी, तांबे – १३ नळी, ३ खंडी, लोखंडी भांडी – २० खंडी, शिशयची भांडी – ४५० नळी, ४५० खंडी, मिश्र धातूंची भांडी – ४०० नळी, ४०० खंडी, मुरदी टक्के – ६ लाख, चांदी – ४ नळी, पावणे ६ खंडी,
तांबे – २७५ नळी, २७५ खंडी, पोलादी ठोकळे ४० नग,
१० लाख रुपये साधे, मिनगारी भांडी – ५० खंडी,
१ लाख सध्या सोन्याचा कांबी, ५० हजार निशाणी चे होंन. साधे सोन , कंबी – १२ खंडी.

रत्नांची व जड जवाहिरांची यादी
(दुर्देवाने संख्या उपलब्ध नाही)
वैडूयें, पैराज, पुषकराज, हिरे, लाल माणिक, पन्ना (हिरवा पाचू) पुखराज (पिवळा पुष्कराज), मोती, पोवळे, लसण्या, नीलम, गोमेद, रत्नजडित अंगठया, रत्नजडीत कमरबंद, धुकधुकी पदके, मोत्याचे तुरे, शिरपेच, चंद्र-रेखा, शिश-फुल, नाक – बिनी (नथनी) रत्न जवडाचे हात पंखे, बाजूबंद, कर्णफुले, तोडा, कांकन, पाटल्या, धेंडी (कर्ण भूषणे).

कापड चोपड
मुंगी पैठणी जरीचे कापड – १ लाख नग, दो-पट्टी जरीचे व बिन जरीचे कापड – १ लाख नग, रेशमी कापड ४ लाख नग, शाल व इतर लोकरी कापड – १ लाख नग, कंबर पट्टे – ५० ठाण, किनखाप वेलबुट्टे दर – १ लाख ठाण, किनखाप साधे – १ लाख ठाण, किरमिजी रंगाचे वेलबुट्टेदार कापड – १ लाख नग, पांढरे कागत – ३२ हजार दस्ते, झर अफशानी कागद (गर्भ रेशमी// सुवर्ण गर्भित) – ११ हजार दस्ते, बाळापुरी कागद २० हजार दस्ते, दौलताबादी कागद – २ हजार दस्ते.
कापड जरी व साधे व रंगाचे व खुमास जिन्नसवार छपन्न देश व दर्यावरील अजमासे किंमत – १ करोड.

मसाल्यांची यादी
लवंग – २० नळी, २० खंडी, जायफळ ३ खंडी, मिरची – ३० खंडी, केशर – ४ खंडी, कस्तुरी १० खंडी, अर्गज ( केवडा) – २ खंडी, चंदन – ५० नळी, ५० खंडी, कृष्णगिरी चंदन – १ खंडी, कापूर ४ खंडी, कोरफड २ खंडी, गुलाल – २० खंडी, रक्तचंदन – २० खंडी, मनुके – १ खंडी, आक्रोड – २ खंडी, खुर्मा (शेवया?), – ३० खंडी, खजूर ४० खंडी, खोबरे – ५० खंडी, वेलदोडा – इलायची – ३ खंडी.

सुगंधी पदार्थ –
मोगरा तेल – ४ खंडी, सुगंधी राई चे तेल – ४ खंडी, चमेली फुलाचे तेल – १ खंडी, कोरफडी तेल – ३० खंडी, नागचंपा तेल – २ खंडी, सुपारी ७० खंडी, गुळ – १ खंडी, हळकुंड – ५०० खंडी, हिरडा – १०० खंडी, बेहेडा – खंडी (संख्या उपलब्ध नाही), चेटकी हिरडा – १००० खंडी, तपकीर ८ हजार खंडी, कुंकू – ५० हजार खंडी, खस खस – १०० खंडी, पारा – २ खंडी.

धान्य –
साळीचे तांदूळ – १७ हजार खंडी, कोद्रु (हरीक) – २ लाख खंडी, हरबरा ५० हजार खंडी, वाटाणे – १२ हजार खंडी, आख्खा मूग – २५ हजार खंडी, तूर १ हजार खंडी, मसूर – ५०० खंडी, तूप – २५ हजार खंडी, मोहरीचे तेल ७० हजार खंडी, हिंग ३० हजार खंडी, सैंधव – २७० खंडी, जिर – २०० खंडी, डिंक – ३०० खंडी, गोपीचंदन – २०० खंडी, सफेद तीळ – १ हजार खंडी, हरताळ – १ हजार खंडी, अभ्रक – १ हजार खंडी, निळ खंडी, गधंक – २०० खंडी, हिंगुळ ३० खंडी, जायफळ – ५० खंडी, कलंक – २ खंडी, पिंपळी – २ खंडी, बडीशेप – २ खंडी, अफू – १०० खंडी, ओवा – १०० खंडी, मध – १०० खंडी, नवसागर – १०० खंडी, लोहचूरा – ९०० खंडी, काळे तीळ – २०० खंडी, रायभोगी भात – १०० खंडी, लाल भात – २०० खंडी, तलीयासरी भात – १०० खंडी, महारी भात – १०० खंडी, खिळी – साळीचा भात – ४०० खंडी, तूर डाळ – २० हजार खंडी, मूग डाळ – २०० खंडी, मसूर डाळ – १०० खंडी, साखर – १५०० खंडी, खडी साखर – ३०० खंडी, मळी – १६०० खंडी, मीठ – १५०० खंडी, लसूण – ५००० खंडी, कांदा – ३०० खंडी.

सर्व यादी समाप्त

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वतः च्या पन्नास वर्षांच्या उभ्या आयुष्यातील जवळ जवळ ३५ वर्षे आपल्या जीवाचा जौहर मांडत, घोड्याच्या खोगिरावर बसून रात्रंदिवस प्रचंड घौडदौड केली. ह्या घौडद्दौडीत त्यांनी जे काही इंच इंच करून मिळवले त्यातील त्यांच्या मृत्यू समयी जे काही त्यांच्या कडे उपलब्ध होते. त्याची माहिती सामान्य इतिहास प्रेमींना करून देण्याचा हा एक प्रयत्न.
ही जी काही संपत्ती होती ती महाराजांची व्यक्तिगत संपत्ती नसून ती स्वराज्याची संपत्ती होती. असे महाराज स्वतः ही मानत. म्हणूनच त्यांनी निर्माण केलेल राज्य हे त्यांच्या व्यक्तिगत नावाने न ओळ्खले जाता ते सबंध म्हराठा जमातीचे म्हणून इतिहासात नोंदवले गेले.
ते म्हणजे – स्वराज्य, मराठ्यांचे राज्य
व ह्या प्रेरनेवरच मराठ्यांनी पुढे सतत तीन दशक लढा देत औरंगजेबास ह्याच मराठी मातीत गाडले . व पुढे मराठ्यांनी शाहू महाराज व नन्तर पुढे पेशवे ह्यांच्या नेतृत्वात ह्या हिंदुस्थान च्या राजकीय सारीपाठावर आपल्या मर्दुमकीने रथाचे सारथ्य आपल्या हातात घेत थेट सिंधु नदी पार भगवे जरी पटके रोवून महाराजांचे आहत तंजावर तहत पेशावर हे स्वप्न पूर्ण केले.
तर अशा प्रकारे स्वराज्याचा डाव मांडुन यशस्वी करणारे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना त्यांच्या ३४० व्या पुण्यतिथी निमित्त त्रिवार मुजरा

माहिती संकलक
रोहित शिंदे

संदर्भ –
सभासद बखर
तारीख – ए – शिवाजी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने
शिवकालीन महाराष्ट्र
शिवकालीन महसूल व्यवस्था
मराठ्यांची प्रशाशन व्यवस्था
इतिहासाच्या पाऊल खुणा – भाग १
स्वराज्याचा वारसा

चित्र साभार
आंतरजाल

टीप –
वरील माहितीतील यादी ही पूर्ण पणे निर्दोष असल्याचा कोणताही दावा हिठे करण्यात येत नाही आहे.
यादीत अनेक ठिकानी, नवे, संख्या आकडे हे अपूर्ण स्वरूपाचे असल्याचे निदर्शनात सहज येत आहे.
लेख पूर्ण वाचून आपल्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्स मध्ये नोंदवाव्यात.
लेख आवडल्यास शेअर करून आपला अज्ञात इतिहास सर्वत्र पसरवावा.

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*