समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

प्रतिष्ठान बद्दल

दुर्ग मावळा प्रतिष्ठान आज पर्यन्त अनेकजण मोठ्या संख्येने विविध कार्यामार्फत सहभागी झाले आहेत. दुर्ग मावळा ची स्थापना हि छत्रपती शिवरायाच्या स्वराज्यच्या संकल्पनेतून कोणत्याही जाती धर्माच्या वादात अडकत न बसता फ़क़्त शिवकार्यासाठी साकार झालेली एक संघटना आहे. आज बऱ्याच संस्था अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे पण दुर्ग मावळा हि संस्था गेल्या वर्षभरापासून सामाजिक कार्य,  दुर्ग भ्रमंती, इतिहास अभ्यास मोहिम, गडकिल्ले संवर्धन मोहिमा सातत्याने राबवत आहे.

दुर्ग मावळाने अतिशय कमी वेळात जोरदार कामगिरी केली आहे. दुर्ग मावळा सामाजिक कार्य, दुर्ग भ्रमंती, गडकिल्ले संवर्धन या तीन वेगवेगळ्या विभागात कार्यरत आहे.

आतपर्यंतचा आलेख खुपच चांगला आहे. छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने हें उपक्रम उत्तमरीत्या पार पडले आहेत व येणाऱ्या काळात यापेक्षाहि चांगल्याप्रकारे आपल्या सर्वांच्या साथीने पार पडेलच.

दुर्ग मावळा हि संघटना रजिस्टर असून सरकारी नियमाप्रमाणे कार्यरत आहे. 

संस्थेची उद्दिष्ट :- 

1) सामाजिक कार्य, गडकिल्ले संवर्धन आणि किल्ले भ्रमंती

2) विविध सण गडावर साजरे कारणे

3) इतिहासावर अभ्यास करणे

4) गरजूना मदत करणे

5) ग्रूप मधुन शिलेदाराना नोकरी व व्यापारात मदत करणे

6) ग्रूप मधील सदस्यांना संकट प्रसंगी मदत करणे

7) देशावर आलेल्या आपत्ती समयी देशासाठी मदत करणे

व वरील उधिष्टांना स्मरूनच दुर्ग मावळा प्रतिस्थानने उरण येथील द्रोणागिरी गड संवर्धनाचे कार्य हाती घेतले आहे. व आपण सर्वांच्या मदतीने ती तडीस न्हेऊ ही खात्री आहे.

आजपर्यंत दुर्ग मावळा ग्रूपने ट्रेक मार्फत आलेल्या निधी मार्फत अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत अनेक गरजू पर्यन्त मदत पोचवली आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात काम सुरू केल आहे. 

संस्थेने आत्तापर्यंत ट्रेक मधून आलेल्या निधी मधून वरील बऱ्याच प्रमाणात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात गरजूंना आत्तापर्यंत जवळपास 500 हून अधिक विध्यार्थी पर्यंत हि मदत आपल्या सर्वामार्फत पोचवली आहे तसेच दुर्गमावळाची भ्रमंती हि अतिशय कमी खर्चात राबवली जाते.    

आत्तापर्यंत पर्यत सर्वांनी प्रमाणिकपणे महाराजांची स्वराज्याची संकल्पना साकारत हें शिवकार्य करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. 

आत्तापर्यंत दुर्ग मावळाला ची साथ दिलीत ती अशीच राहूदेत. येणाऱ्या काळात हें शिवकार्य त्यापेक्षाहि वाढत राहील हा मावळा स्वराज्याची सेवा करण्यास कटिबद्ध राहील यात शंका नाही. 

–  दुर्ग मावळा प्रतिष्ठान