समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

अटकेपार झेंडे - इतिहासातील महाराष्ट्राचा झंझावात - दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य - रजिस्टर

१७५२ ते १७५८ मराठी फौजानी अभूतपूर्व अशी कामगिरी केली होती. मराठ्यांनी थेट अटकेपार झेंडे रोवले याच इतिहासाला पार्श्वभूमी आहें ती यानंतर घडलेल्या पानिपतची.पानिपत घडले १७६१ ला पण त्याआधी मराठी सैन्याने थेट अफगाणिस्तान पर्यन्त मजल मारत इतिहास घडवला.
काळ होत १७५२ सालच दिल्लीवर मराठ्यांच प्रभुत्व होत पण नजीबखान याला मान्य नव्हते. अब्दालीला दिल्लीवर आक्रमक करण्याचे निमंत्रण मिळाले राजपूताचा देखील याला पाठिंबा होता. दिल्ली झोडायची अशी मनीषा अब्दालीची सुद्धा होतीच.
एव्हाना मराठा फौजा मागरी पुण्याकडे गेल्याच पाहताच मुघलाच्या ताब्यात असलेल्या पेशावर ला धडक दिली आणि लाहोर , सतलज पर्यन्तचा मुलुख काबीज करून ५ जानेवारीला सरहिंद ला आणि २२ जानेवारी मधे दिल्लीत पोचला.
अब्दाली दिल्लीआल्यावर दिल्लीत धांदल उडाली लूटमार सुरू झाली. अब्दालीच्या वकिलांनी दोन कोट खंडणी आणि सरहिंद पर्यन्तची मागणी ऐकून वजीर सुन्न पडला. या सगळ्यात नजिबखान रोहिला सामील होता. दिल्ली लुटून अब्दाली मथुरेच्या दिशेने गेला. अटक पासून ते मथुरेपर्यन्त प्रेतांचे ढीग पडले होते. हिंदु क्षेत्र म्हणून मथुरेत मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली तसेच मुली पळवल्या. पुढे गोकुळ मधे पण तेच केले.
पुण्याहून रघुनाथराव आणि मल्हारराव जयपूर पर्यन्त आल्याची खबर मिळताच अब्दालीने आपली मोहीम माघारी घेतली.
रघुनाथराव पेशवा ११ ऑगस्ट ला दिल्लीत आला नजिबने दिल्ली लढवण्याचा पर्यन्त केला आणि १५ च दिवसात त्याने मागार घेतली. पुन्हा या भानगडीत पडणार नाही हे आश्वासन देऊन तों रोहिलेखंडात परत
गेला. पानिपत घडवण्यासाठी महत्त्वाचा भूमीका पार पडणारा नजिबचा खात्मा इथेच झाला असता तर बहुदा पानिपत घडले नसते.
दसऱ्याच्या मुहूर्तावर मराठी फौजा पंजाब कड़े रवाना झाल्या. अब्दालीने शिखांच्या सुवर्णमंदिराची सुद्धा जाताना नासधुस केली होती.
८ मार्च १७५८ ला मराठी फौजा सरहिंद ला पोचल्या. पुढे मराठे लाहोरच्या दिशेने निघाले. मराठे आले पाहून अब्दालीच्या मुलाने तैमूरशहाने लाहोरहून पळ काढला. लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले गेले मानाजी पायगुडे अधिपत्यखाली मराठी फौजानी लाहोर वर कब्जा केला. मराठी घोडी लाहोरत फुरफूरत होती.
मराठी फौजा आपल्या मुलखातून फार दूरआल्या होत्या. त्याना आपल्या घरची ओढ लागलेली असणारच. मराठ्यांना चिनाब नदी पुढे जाऊ देत नव्हती. तैमूरशहा सिंधू नदी ओलांडून अटक पेशावर करत तों खैबरखिंडीतुन तों काबूलला पोचला.
१७५७ च्या ऑगस्ट मधे मराठी फौजांनी सिंधू नदी ओलांडली आणि अटक किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवला. अटकेपार झेंडे लागल्याच्या बातमीने संपूर्ण मराठी दौलत उत्साहित झाली. तेथूनच पुढे ६० किलोमीटर अंतरानंतर मराठ्यांनी पेशावर गाठले आणि फौजा पोचल्या थेट खैबरखिंडीत. इथून मराठ्यांनी अफगाणिस्तान पाहीला.
मराठी फौजांनी अब्दाली फिटाळलेल्याच्या बातम्या थेट इराण मधे पोचल्या. इराण शहाला देखील मराठ्यांच्या पराक्रमाची धडकी भरली. इराणच्या शहाने रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर यांना पत्र धाडल त्यात त्यानी दोस्तीचा पैगाम पाठवला. हिच मराठ्यांच्या शौर्यच्या परिसीमेची पावती आहें. मराठ्यांच्या शौर्यचा दरारा त्या काळी किती होता हे या घटनेद्वारे दिसून येतें.

मराठ्यांनी अफगाणिस्तान मधे ” हरहर महादेव ” आरोळीने परिसर दणाणून सोडला. सह्याद्रीच्या वाघांनी थेट अफगाणिस्तान पर्यन्त डरकाळी फोडली. आपल्या समशेरी गाजवत आपल्या शौर्यची परिसीमा गाठली. नुसता विचार तरी केला तरी आपल्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही.
नमन त्या शौर्यला आणि नीडर इतिहासात अजरामर झालेल्या मावळ्यांना🚩🚩🚩🚩
🖋 :- प्रकाश कावले
संदर्भ :- झंझावात पुस्तक

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*