समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

मराठ्यांच्या इतिहासातील एक अल्पायुषी राजपुत्र - दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य - रजिस्टर

राजा कर्ण हे नाव इतिहास प्रेमींना तसे सहसा अपरिचित असेच आहे. कारण ह्या राजपुत्रास अवघे ९ वर्षाचे आयुष्य लाभले. व आपल्या महाधुरंधर पित्याच्या निधना पाठोपाठ हा राजपुत्र ही इहलोक सोडून निघून गेला.

हे पिता पुत्र म्हणजे छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांचा पुत्र राजा कर्ण.

राजा कर्ण ह्याचा जन्म मार्च- एप्रिल १६९१ दरम्यान सगुणाबाई ह्यांच्या पोटी झाला.
(संदर्भ – दाभाडे घराण्याचे कागदपत्रे)

राजाराम महाराजांना झालेला हा पहिला पुत्र होता. त्यामुळे महाराज विशेष प्रसन्न होते व ह्या राजपुत्राचे जन्मा वेळी महाराजांनी खनडोजी दभडेंना ५ चाहुर जमीन ही इनाम म्हणून दिली होती (संदर्भ – दाभाडे घराण्याचे कागदपत्रे)

महाराजांचा हा अतिशय लाडका पुत्र ही होता.कारण एवढ्या कमी वयात राजपुत्र राजा कर्ण ह्यांस छत्रपतींनी पाच हजारांचा सरंजाम व कराड ची देशमुखी व त्याच बरोबर राजा हा किताब ही दिली होती. परन्तु राजपुत्र लहान असल्याने सुंदर तुकदेव नावाचा इसम ह्या देशमुखीचा मुतालिक म्हणून कारभार पाहत होता.
(संदर्भ – मसूर चे जगदाळे ह्यांची कागतपत्रे)

राजा कर्ण ह्यांची स्वतःची अशी राजमुद्रा ही होती व ती त्यानच्या काही उपलब्ध असलेल्या पत्रांपैकी एक पत्रा वर उंमटव लेली ही आहे.

राजा कर्ण ह्यांचे मराठ्यांच्या जिंजी दरबारात खूप महत्व होते त्याचे उदाहरण म्हणजे १६९७ ला औरंगजेबाच्या धमकीवजा इशारा नन्तर जुल्फिकारखानाने जिंजी चा वेढा आवळला तेव्हा जिंजी किल्ल्यातून मराठ्यांचे एक शिष्ट मंडळ बोलणी करण्यास मुघल छावणीत गेले होते. तेव्हा ह्या शिष्ट मंडळाचे औपचारिक नेतृत्व राजा कर्ण ह्यांनी केले होते. तेही वयाच्या अवघ्या ६व्या वर्षी. कदाचित मुघलांवर वजन पडावे म्हणून मत्ताबर असामी पाठवण्याच्या विचार पर्यंत येऊन छत्रपतींनी स्वतःच्या पुत्रासच शीर्ष नेतृत्व देऊन पाठवण्या मागे कदाचित आपण ह्या तह साठी किती गंभिर आहोत हे सुचवायचे असेल.
परन्तु ह्यातूनच राजा कर्ण ह्यांचे महत्व ही अधोरेखित होते.

ह्या राजपुत्र बाबत युरोपीय व्यापाऱ्यांच्या नोंदीत काही वादग्रस्त उल्लेख ही आहेत
ते पुढील प्रमाणे –

जिंजी दरबाराचा प्रमुख कारभारी प्रहलाद पंत निराजी ह्याचे पूर्वी प्रमाणे राजाराम महाराज ह्यांच्यावर वजन राहिले नसल्याने तोह इतर सरदारांना हाताशी धरून छत्रपतींना बाजूला सारून राजा कर्ण ह्यांस गादीवर बसविण्याच्या खटपटीत आहे.

परन्तु इतर समकालीन कागद ह्यास पुष्टी देत नाहीत

पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यू नन्तर महाराणी तारा बाई ह्यांचा पुत्र शिवाजी राजे द्वितीय हे गादी वर आले. हे जरी सर्व ज्ञात असले तरीही ह्या दोन छत्रपतींच्या दरम्यान राजा कर्ण ह्यांचे मराठा सरदारांनी राज्यरोहन करून त्यांना गादीवर बसवल्याची नोंद मुघल दरबारातील बातमी पत्रातुन मिळत असून त्यास समकालीन मुघल इतिहासकार साकी मुस्तईद खान व भीमसेन सक्सेना हे त्यांच्या लिखाणातून पुष्टी देतात.

परन्तु नजीकच्या काळात उजेडास आलेले यादव दफतर ह्यास छेद देते.

आशा ह्या वलंयनकीत परन्तु अतिशय अल्पायुषी राजपुत्र राजा कर्ण ह्यांचा मृत्यू त्यांच्या पित्याच्या मृत्यू नन्तर अवघ्या ३ आठवड्यातच वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी देवीच्या साथी च्या रोगाने झाल्याचा उल्लेख फारसी साधने करतात.

लेखक
रोहित शिंदे

संदर्भ

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३
संताजी
शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज
सरदार जगदाळे ह्यांची कागदपत्रे
सेनापती दाभाडे ह्यांची कागदपत्रे
गिरजोजी यादव ह्यांची कागदपत्रे
मासिरे इ आलमगिरी

नोंद – खाली दिलेले छायाचित्र हे आंतरजाल वरून घेतलेले आहे व ते केवळ एक प्रतिकात्मक छायाचित्र आहे. लेखतील मूळ चरित्र चे हे छायाचित्र नाही.

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*