समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

मोघल आणि राजगडचा आसमंत

मार्च १६६५, मोघलांचे हिरवे वादळ मिर्झा राजा जियसिंग च्या नेतृत्वात पुरंदर वर आदळले होते.

परंतु पुरंदर च्या दक्षिण दरवाजातून मराठ्यांनी मोघलांच्या नाकावर टिकचून रसद वर गडावर पोहचवली होती ह्याची बातमी दिलेरखानास कळताच तो पाहऱ्यावरील सरदार दाऊदखनावर चांगलाच उसळला. व त्यास वेढ्यातून परत मोघल छावणीत हकलवून दिले. दाऊदखान आता स्वतःवर आलेली नामुष्की दूर करण्यासाठी मिर्झाराजांकडे मुघल तक्ता शी इमान प्रकट करण्यासाठी मुलूखगिरी ची संधी मागू लागला.

मिर्झा ही स्वराज्याच्या विरोधात दुसरी आघाडी उघडन्याच्या तयारीतच होते. त्यांनी दाऊदखनास मुघल राजपूत सरदारांचा भरणा असलेली ७ हजारांची फौज व देऊन राजगड च्या दिशेने रवाना केले.

राजगड कडे कूच म्हणजे दररया खोऱ्यातील मावळ प्रदेश, भूतकाळात बहमनी व आदिलशाही फौजेचीही हिकडे तोंड वळवण्यास छाती झाली न्हवती, पण मग आताच विलासाची सवय असलेल्या मोघली फौजेस ह्या स्वारीचे स्फुरण कसे काय चढले? त्याचे उत्तर म्हणजे मावळातील प्रदेशाची जण असलेले व वतनाची हव्यास असलेले बाळाजी नाईक शिळीमबकर व विठोजी हैबतराव शिळिंबकर हे मिर्झा राजा ने टाकलेल्या जाळ्यात स्वतःहून गुरफटले होते.

दाउद खानाचा रोख रोहिडा ते राजगड असा होता,
(२७ एप्रिल ला दाऊद खान रोहिड्याच्या पायथ्याशी आला.) ह्या मुलखात स्वराज्यातील ५० गावे व अनेक मातबर सरदारांचा कुटुंब कबिला होता. नेमकं हेच सावज मोघलांच्या निशाण्यावर होते. शिकारी कुत्री जशी सशांच्या कळपावर तुटून पडावी तसाच पराक्रम मुगलांनी रोहिडा ते राजगड च्या आसमंतातील ५० गावात केला.
तिथून वाचलेले लोक डोंगर रांगेतील दुर्गम आशा खेड्यात जमले. परंतु शिळीमकरांनी शत्रूस तेथे ही पोहचवले. आता जमलेले लोकांपैकी लढाऊ बाण्याचे लोक पुढे येऊन खिंडीच्या सहाय्याने मोघली टोळधाडेस प्रत्युत्तर देऊ लागले. परंतु मोगलांची जास्तीची कुमक येताच मात्र त्यांनी डोंगर दर्यात लुप्त होण्याचा निर्णय घेतला. येथील फौजेची नासाडी भरून काढण्यासाठी मुघलांनी मग गावातील उरलेली रिकामी घरे व इतर जनगम मालमत्ता (नेहमीच्या सवयी प्रमाणे) साफ करून तेथेच भक्षास गिळलेल्या अजगरा सारखे सुस्थावले व दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ एप्रिल १६६५ रोजी हा मोगलांचा मस्तवाल कळप कळयुगातील नररूपी शिवाचे स्थान असलेल्या मराठ्यांची राजधानी राजगड जवळ करू लागला. .

रोहिडा राजगड आसमंतातील गोर गरीब जनते विरुद्ध रुस्तमी पराक्रम केल्याच्या अविर्भावात हा झुंडरूपी कळप दुसऱ्या दिवशी राजगड च्या सणजीवन माची च्या ध्रुव दिशेस म्हणजेच उत्तरेस स्थिरावला. छावणीतून दाऊदखान ह्या बारा कोसांचा घेर असलेल्या ह्या मराठ्यांच्या राजधानीच्या डोंगरावर चाल करून महादरवाजा कब्जात घेण्याचा मनसुबा आखत असतानाच बाहेर त्यास अचानक बाहेरील गोंधळ ऐकू आला. व बाहेर येताच त्यास आकाशातून उल्कापात होत असल्याचे भास झाले. कारण मोगल छावणी स्थिरावते ना स्थिरावते तोच संजीवन माची वरील जगदंबेच्या भुत्यांनी गोंधळातील पोत जाळवा तसा तोफांना बत्ती दिल्या होत्या. तोफांतील पडणाऱ्या गोळ्यामुळे छावणीतील राजपुतांस मात्र मा काली च जणू नभांतून आग ओकत असल्याचा भास होत होता.

वरून कोसळणाऱ्या गोळ्यात भाजून करपण्यापेक्षा छावणी मागील गुंजवणी नदीकडे मोगलांनी धाव घेतली. पण विस्कळीत झालेल्या मोगलांस सह्याद्रीत आज कोणी वाली न्हवता. बाजारबुनगे तर ह्या पळपुत्या हशमांच्या गर्दीत अक्षरश कुस्करले जात होते. गोफनातील धोंड्यांनी तर झाडावरील पिकलेल्या फळ प्रमाणे मोघली डोकी टिपली होती. जसे मोघल पांगु लागले तसे तडबंदीतील जनग्यांमधून बरकनदाज चाप ओढू लागले व चऱ्यांमधून धनुर्धर प्रत्युनशा खेचू लागले. सह्याद्रीचा सोबती वारा ही त्यास साद देत होता. मोगलांची पुरती दैना झाली होती. आता आजच कदाचित जन्नत मधील हूर आपल्याला न्हयायला येतात की काय अशी धास्ती मोंगलास वाटू लागली. जवळपास ३ प्रहर मार खाऊन वाचलेल्या मोंगलास आता रणात धीर धरवत न्हवता. त्यांनी आता उरलं सुरला सर्व अवसान एकत्र करून राजगडास पाठ व बुडाला पाय लावण्याचा (पळून जाण्याचा) युद्धकलेतला एक वेगळाच पवित्रा घेतला होता. ह्यात मोघल वा राजपूत हे वेगळे न राहता खांद्याला खांदा लावून सुसाट सुटले होते. इस्लामी वीरांच्या ह्या पवित्र्यात मात्र मावळात शिरताना जी खुमखुमी होती तिचा लवलेश ही उरला न्हवता. राजगड च्या माऱ्याच्या टप्प्यातून जे दैवी कृपेने वाचले ते आता सह्याद्रीच्या निसर्गरूपी भौगोलिक कचाट्यात सापडले होते. पण हिठे शिलिंबकरांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. जाताना मागे राजगडाकडे फक्त अश्वांवर स्वार असलेली मनुष्यरूपी धडावरील भुंडी डोकी फक्त नजर फेकत होती, त्यावरील मोगली पगड्या केव्हाच राजगडाच्या आसमंतातील मातीत मिळाली होती त्या बरोबर मोगली अब्रू ही.

समाप्त

लेखक
रोहित शिंदे

संदर्भ

आलमगिरनामा (मोहम्मद काजी)
राजगड कथा पंचविसी (आप्पा परब)


(व्याकरणाची जान नसल्यामुळे कृपया अशुद्धलेखनास माफी असावी.)

3 Comments

Abhishek bhargude – March 25, 2020

Gud

Balbhim Ghandat – March 25, 2020

Very nice information Sir.

Sachin Sonawane – May 30, 2020

अप्रतिम 🚩

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*