समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

शिवपुण्यतिथी ३४० वी

काही दिवसांनी राजास व्यथा ज्वराची झाली, राजा पुण्यश्लोक कालज्ञान जाणे,विचार पाहता आयुष्याची मर्यादा झाली असे कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यामधे सभ्य भले लोक बोलावून आणले.

मग त्यांस सांगितले की , “आपली आयुष्याची अवधी झाली आपण कैलासास श्रीचे दर्शनास जाणार. आपण तो प्रयाण करतो”. येणे प्रमाणे राजे बोलले.

सर्वांचे कंठ दाटून नेत्रांपासून उदक श्रवु लागलें, परम दुःख झाले, त्याउपरी राजे बोलले की

तुम्ही चकूर होऊ देऊ नका, हा तो मृत्यूलोकच आहे. या मागे किती उत्पन्न झाले तितके गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे, आता अवघे बाहेर बैसा. आपण श्रींचे समरण करतो. म्हणून अवघीयास बाहेर बसिवले.

आणि राजियानी भागीरथीचे उदक आणून स्नान केले. भसम धारण करून रुद्राक्ष धारण केले. आणि योगाभ्यास करून आत्मा ब्रम्हांडास नेऊन दशद्वारे फोडून प्राणप्रयाण केले.

शालिवाहन शके १६०२ रौद्र नाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा रविवारी दोन प्रहरी काळ रायगडी झाला. त्यांनतर शिवदूत विमान घेऊन आले. आणि राजे विमानी बैसून कैलासास गेले. हे जड शरीर मृत्यूलोकी त्याग केला.

राजीयांचे देहवासन झाले त्या दिवशी धरणी कंप झाला.गगनी धूमकेतू उदेला. उल्कापात आकाशातून झाला. रात्री जोड इंद्रधनुष्य निघाली.अष्टदीशा दिग्दह होऊन गेल्या. श्रीशंभुमहादेवी तळ्याचे रक्ताम्बर झाले. पाण्यातील मत्स्य बाहेर येऊन अमसवणी जाहले. ऐशी अरिष्ठे जाहली. मग राजीयांचा कलेवर चंदनकाष्ठ व बेलकष्ट आणून दग्ध केले. स्त्रिया, राजपतण्या, कारकून व हुजरे सर्व लोकांनी सांगितले की, धाकटा पुत्र राजाराम ह्यांनी क्रिया करावी. सर्वांनी खेद केला. राजाराम यांनी अत्यांत शोक केला. त्यांनतर उत्तरकार्य कनिष्ठंणी करावे असें सिद्ध केले. वडीलपुत्र शंभाजी राजे वेळेस नाहीत. याकरिता धाकट्यांनी क्रिया केली. असे राजीयांचे चरित्र व्याख्यान उत्पन्न काळा पासून देहवसान पर्यंत झाले.

राजा साक्षात केवळ अवतारीच जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदा पासून रामेशवर पर्यंत द्वाही फिरली. देश काबीज केला. अदलशाही,कुतबशाही, निजमशाही, मोगलाई ह्या चारी पातशाह्या व समुद्रातील बेविस पातशहा असे जेर जप्त करून नवेच राज्य साधून मराठा पातशहा सिंहसनाधीश छत्रपती जाहला. प्रतिइच्छा मरण पाऊण कैलासास गेला. ये जातीचा कोणी मागे जाहला नाही. पुढे होणार नाही असे वर्तमान महाराजांचे जाहले. कळले पाहिजे.

सभासद बखर

छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना आज ३४० व्या पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा.

शब्दांकन –
रोहित शिंदे

2 Comments

Kirti Natekar – April 8, 2020

अप्रतिम लिखाण.छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏

Shriniwas Rajendra Shinde – April 24, 2020

Sir I want imore detail s information of Shri Karnaji Shinde.

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*