समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सिंहगर्जना - दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य - रजिस्टर

भर दिवाण – इ – खास मध्ये स्वराज्याच्या नरसिंहाने मराठ्यांच्या आत्मसन्मानाची स्वाभिमानाची सिंहगर्जना केली. ज्याने सारा मुघल दरबार देशी विदेशी वकिलांसह, दणाणून गेला. स्तब्ध झाला. दोन क्षुल्लक अधिकाऱ्यांकडून स्वागत, दरबारात आल्यावर ना कुठले बिरुद ना चर्चा. जयसिंहशी झालेल्या चर्चा मधून आपल्याला आशा प्रकारची वागणूक मिळेल अशी महाराजांची अपेक्षा न्हवती. महाराजांना जिथे उभे होते,तिथून बादशाह दिसत ही न्हवता.
दरबारात मानपाणाचा कार्यक्रम सुरू झाला,त्यातून ही महाराजांना वगळले गेले.त्यामुळे महाराज संतापले.

राजस्थानी कागतपत्रातील वर्णन –
सेवो दिलगीर होवोगुस्सा खायो गलगलीसी
आकख्या हुओ!

महाराजांनी रामसिंह ला बोलावले, रामसिंह ने विचारणा केल्यावर महाराज कडाडले.
तुम_देखो! तुमहारा बाप देख्या, तुमहारा पातशाही देख्या,
मै ऐसा आदमी हो जू मुझे गोर करने खडा रखो
मै तुम्हारा मनसब छोड्या,
मुझे खडा तो करीना सीर रख्या होता.!

यांनातर महाराजांनी थेट तख्ताकडे पाठ फिरवली आणि दरबारातून बाहेर पडू लागले. रामसिंह ने महाराजांचा हात पकडून अडवण्याचा प्रयत्न केला. महाराज, रामसिंह चा हात झिडकारत दरबारातून बाहेर पडले. मागोमाग रामसिंह ही आला , व महाराजांची समजूत काढू लागला. तेव्हा महाराजांनी दरबारात येण्यास नकार दिला व रामसिंह ला सुनावले.

म्हारो मरण आयो!
यो तो तुम मुझे मारोंगे या मै अपघात कर मरोंगा !
मेरा सिर काटकर ले जावो तो ले जावो,
मै पातशाह जी की हुजुरी नही चलता!

शिवाजी महाराज ऐकत नाही असे लक्षात आल्यावर रामसिंह दरबारात गेला. बादशहास त्याने घडलेला वृतांत कथन केला. त्या नंतर बादशाहने मुल्ताफीतखान, अकिलखान,मुखलीसखान ह्यांना शिवाजी महाराजांना खिल्लत देऊन,समजूत काढून दरबारात घेऊन येण्यास सांगितले. ते तिघे महाराजनकडे खिल्लत घेऊन गेल्यावर महाराज त्यांना म्हणाले.

मै सिरो पाव न लो! मुझे पातशाह जी जसवंतसिंह सों तलो खडा गौर करीने खडा करो! सो मै ऐसा आदमी हो जू मुझे असौ गौर करीने खडा करो ! मै पातशाह जी का मनसब नही लेता ! चाकर नही_राहता ! मुझे मारणा चाहो तो मारो ! कैद मे किया चाहो कैद मे करो सरोपाव न पहरी !

महाराजांचे बोल ऐकून सरदार दरबारात गेले, बादशहास बाहेरील प्रकार समजल्यावर बादशाहने रामसिंहास शिवाजी महाराजांना स्वतः च्या घरी घेऊन जाण्यास सांगितले.

त्या प्रमाणे रामसिंह महाराजांना स्वघरी घेऊन गेला. त्याने खाजगी दालनात महाराजांची समूत काढण्याचा प्रयत्न केला. पण महाराज काहीच एकूण घेत नाही, हे जाणून महाराजांना आपल्या स्वतःच्या तळावर जाण्यास निरोप दिला.

संध्याकाळी सिद्दी फौलादखान, परतीतराय हरकार ह्यांनी रामसिंहास शिवाजी महाराजांची समजूत काढावी असा बादशाहचा निरोप सांगितला.

त्यामुळे रामसिंहणे गोपीराम ह्या सेवकास सुरवातीस काही सुका मेवा व फळे घेऊन पाठवले. त्याने महाराजांस ९ रुपये नजर केले. त्यांनंतर बुल्लूशाह व गिरधलाल मुंशी चर्चेस आले. बुल्लूशाह याने महाराजांस ५ मोहरा अर्पण केल्या. तो पर्यंत महाराजांचा राग थोडा कमी झाला होता. चर्चेअंती महाराजांनी शंभाजी राजांना रामसिंह बरोबर दरबारात पाठवण्या बद्दल सहमती दिली.

दिवस सत्र समाप्त

ज्या मुघल दरबारात डाव्या हातावर उजवा हात ठेवून, मान खाली घालून उभे रहावे लागत असे. बोलण्याची परवांगी मिळाल्यावर तोंडावर हातरुमाल ठेऊन हळू आवाजात बोलावे लागत असे.

आशा दरबारात शिवाजी महाराजांनी आत्मसन्मानाची, स्वाभिमानाची सिंहगर्जना केली. थेट तख्ताला पाठ दाखवून दरबारातून निघून गेले. महाराजांच्या ह्या कृतीने दरबारातील इतर उपस्थितांची काय अवस्था झाली असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो.

बादशाहने ही शिवाजी महाराजांच्या ह्या मनस्वी, बाणेदारपणे वागण्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
उलट दरबार बाहेर सरदार व पुन्हा रामसिंहास महाराजांची समजूत काढण्यास पाठवले.

समाप्त

शब्दांकन
रोहित शिंदे

दि. १२ मे, २०२०

माहिती साभार
समरधुरंधर
राजस्थानी कागतपत्रे
कित्ता
शिवाजी (जदुनाथ सरकार)

चित्र साभार
आंतरजाल

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*