समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

शंभाजी महाराजांच्या चोख मुलकी कारभाराचा पुरावा - दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य - रजिस्टर

१४ मे – संभाजी महाराज जयंती विशेष

सध्या इतिहास वरून दोषारोप वारंवार होतात. आशा परिस्थितीत इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अस्सल साधन म्हणजे तत्कालीन पत्रे. तत्कालीन पत्रे ही त्या काळातील समबंधीत इतिहासाची , इतिहास पुरुषांची, त्यांच्या राज्यकारभारांच्या व्यवस्थेची दर्पण आहेत. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी ही समकालीन पत्रे हे मोलाचे साधन आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वराज्याची पारदर्शी मुलकी व्यवस्था चे वर्णन करणारे व शंभाजी महाराज ह्यांच्या युवराज पदावर असतानाच चोख कार्यपद्धतीची ग्वाही देणारे सदर पत्र हिथे देत आहे. ( हे पत्र पूर्वी पासूनच प्रकाशित आहे ) आज च्या ह्या लेख – माहिती साठी सदर पत्र निवडण्याचे कारण म्हणजे आज इंग्रजी दि. नुसार शंभू महाराजांची ३६३ वी जयंती व हे पत्र शंभाजी महाराजांचे युवराज पदावर असताना उपलब्ध असलेले पहिले पत्र आहे. हे एक ताकीत पत्र असून शंभाजी महाराजांनी युवराज पदावर असताना पुण्याच्या सर हवालदार यास दिले आहे.

पत्राचा विषय व मूळ मुद्दा

राज्यभिषेकाचा खर्च भरून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सिंहासन पट्टी व मिरासपट्टी बसवली होती. परंतू पुणे प्रांत ह्यातून वगळला होता. तरीसुद्धा पुणे प्रांत चा सरहवालदार गघो भास्कर ह्याने पुणे प्रांत मधील कऱ्हेपठार तालुक्यातील चांबळी गावच्या निळोजी,शंकराजी व विसाजी यांस कडे त्यांच्या इनामी जमिनिवर २५ होणं मिरासपट्टी लावली. हा प्रकार शंभाजी महाराजांस कळताच महाराजांनी सरहवालदार यास ताकित पत्र पाठवले. व त्यात लिहले की “सदर प्रांत मिरासपट्टी तुन वगळला असताना तुम्ही स्वमताने मिरासपट्टी लावता व पैशे मागता? हा काय प्रकार आहे”
“हिथुन पुढे त्यांना एक रुकयेचा ही त्रास देऊ नये. ही इनामी जमीन आहे, त्यास मिरासपट्टी लावू नये व इतर कोणत्याही बाबीस त्रास देऊ नये. ही तुम्हास ताकित आहे.”

पत्र खालील प्रमाणे

श्री
मशहुरल अनाम राजश्री गघो भास्कर सरहवालदार व कारकून पा. पुना प्रती राजश्री शंभाजी राजे शहूर सन खनम सबैन व आलफ (डावीकडे मोरोपंतांची मुद्रा आहे – श्री शिवचरणी तत्पर त्र्यंबक सुत मोरेश्वर) मा निलोजी निलकंठराऊ शंकराजी निलकंठराऊ व विसाजी निलकंठराऊ व त्र्यंबक निलकंठराऊ यांसी मोजे चांबिली ता कऱ्हेपठार पा मजकूर येथे इनाम कास टका एक आहे त्यावरी तुम्ही मिरासपटी पंचवीस होन घालूनु पैका मागता म्हणऊन कलों आलें तरी पा मजकुरावरी मिरासपटी घातली नसतां उगेच आपले मतेने पैशे मागता हे कोण खेश या उपरी त्यांस येक रुकेयाचा तसविस न देणें आजी ता त्याचे इनामास पेशजी रुका घेतला नाही व तसविस लागली नाही पेस्तरहि तुम्ही मिरासपटी व हरयेक बाबे तसविस न देणे ताकित असे. तालीक लेहून घेऊन असल परतून देणे

छ १८ सफर 2nd पा हुजूर 3rd सही

पत्र समाप्त
प्रस्तुत पत्रा वरून आपल्याला शंभाजी महाराजांची राज्य कारभार पाहण्याची व काम करण्याची पद्धत लक्षात येते. व सदर पत्र हे स्वराज्य च्या चोख मुलकी व्यवस्थेचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.

समाप्त

माहिती संकलक
रोहित शिंदे

संदर्भ –
शीवचरित्र साहित्य खंड – ३
छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे

टीप –
मूळ मोडी पत्र खलील फोटो मध्ये देत आहे

पूर्ण माहिती वाचून झाल्यास आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा.

माहिती आवडल्यास कृपया शेअर करून स्वराज्याचा चोख मुलकी कारभार चा अज्ञात इतिहास सर्वत्र पोहचवा.

2 Comments

mukund sarnaik – September 27, 2020

मला आपला फोन नंबर मिळू शकेल का माझे
नाव मुकूंद म सरनाईक मुळ रहाणार चांबळी सध्या पुणे.माझा नंबर ७३५०१७६०२८

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*