समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

छत्रपती शाहू महाराज व त्यांचे मानसपुत्र - दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य - रजिस्टर

१८ मे १६८२ – जन्मदिवस

स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज
जयंती विशेष लेख

१७०७ मध्ये औरंगजेब च्या मृत्यू नंतर व प्रदीर्घ संघर्षाची झळे सोसून आपले मूळ असलेल्या उत्तरेत म्हणजेच दिल्लीकडे निघालेल्या मोघल छावणीतून शाहू महाराज १८ वर्षांच्या कैदेतून मुक्त होत स्वराज्य कडे निघाले.

दक्षिणेत आल्यावर शाहू महाराज टप्प्या टप्प्या ने पुढे सरकत होते. मार्गात त्यांना एक एक सरदार ही येऊन मिळत असल्याने त्यांचा पक्ष ही दिवसें दिवस बळकट होत चालला होता.

अशाच प्रकारे दौलताबाद सुभ्यातून मार्गस्थ होत असताना पुढे नगर जवळ मुक्काम पडला होता. त्यावेळेस छावणी साठी दाना गोठा,रसद ह्याची सोय करण्यास काही लोक बाहेर पडले असता पारद गावचा पाटील शाहजी लोखंडे हा त्याच्या जमावा सह मार्गात आडवा आला. तेथे काही झटापटी ही झाल्या. छावणीत बातमी कळताच काही पथके लोखंडे पाटलावर चालून गेले. हा कसलेल्या शिबंदी चा जोर उघड्या रानात आपल्याला सोसणार नाही. हे जाणून सुरक्षतेच्या दृष्टीने पाटील आल्या पावली स्वतः च्या गढी कडे पुढील लढा देण्यास निघून गेला.

महाराजांची फौज ही त्याचा माग काढत पारद गावच्या लोखंडे पाटलाच्या च्या गढी समोर येऊन उभी ठाकली.

एकूण रंगारंग पाहून शहाजी लोखंडे पाटील गढी तुन स्वतः च्या जमाव व गावातील इतरां सह गढी च्या सहाय्याने शाहू महाराजांच्या शिबंदी शी झुंजू लागला.
ह्या पारद गावच्या गढी च्या लढ्यात उभयपक्षातून एकमेकांवर हल्ले – प्रतिहल्ले ही केले गेले.

पाटलाचा जमाव तोकडा होता. महाराजांच्या फौजे समोर त्याचा निभाव लागणे ही तसे अवघड च होते. शेवटी जे अभिप्रेत होते तेच झाले. शाहू महाराजांच्या फौजेने पाटलाचा व गावकऱ्यांचा प्रतिकार मोडीत काढत गढीवर व गावावर ताबा मिळवला. ह्या हातघाईच्या लढाईत शहाजी लोखंडे पाटील मात्र पडला.

आता पूर्ण गाव व गढी महाराजांच्या ताब्यात होते. शहाजी लोखंडे पाटील ह्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने पुढील प्रसंग चे भान राखत स्वतः च्या मुलाला शाहू महाराजांच्या पायावर घातले. व ह्या वडिलांचे छत्र हरवलेल्या अनाथ मुलास स्वतः च्या कोपातून मुक्त करण्याची महाराजांस विंनती केली.

खरेतर तिने अजून शाहू महाराजांस पूर्ण ओळखले न्हवते. त्यामुळे कदाचित आपल्या व आपल्या बाळाच्या जीवाचे भय तिला वाटत होते. परंतू ह्या शहाजी पाटलाच्या पत्नी व मुला समोर विजयी मुद्रेत शाहू महाराजांच्या रूपाने मराठ्यांची व महाराष्ट्र धर्माची परंपरा असलेली व स्वराज्यात पूर्वपार पद्धतीने कसोसिने पाळले गेलेले पवित्र असे मर्यादेय विराजते ह्या धोरनाचे मूर्तिमंत उदाहरण उभे होती. त्यामुळे त्या स्त्रीस व तिच्या मुलास अभय मिळाले. महाराजांनी कोणताही आढभाव मनात न ठेवता त्या मुलास अभय दिले. व पारद गाव त्यास इनाम करून दिला.

मोघल छावणीतून निघून आल्यावर स्वराज्याच्या वाटेवर असताना आतापर्यंत सगळे निर्धोक पणे पार पडले होते. परंतू ह्या पार गावात महाराजांनी दिलेली ही पहिलीच लढाई होती. व ह्या पहिल्याच लढाईत फत्ते मिळाल्याने त्याची आठवण म्हणून महाराजांनी ह्या शहाजी पाटील च्या मुलाचे नामकरण फत्तेसिंग असे केले.

ह्या घटने मुळे आपल्या सर्वांना ह्या घटनेच्या तीन दशक पूर्वी घडलेल्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळेच्या कर्नाटक मधील यादवाड जवळील गदग प्रांतातील बेलवडी च्या गढीच्या वेढ्याची व त्या लढाईत शरण आलेल्या मल्लवा बाई (सावित्री बाई) त्यांचे पुत्र ह्यांस छत्रपती शिवाजी महाराजांनी दूतभात साठी इनाम म्हणून परत दिलेले त्यांचे मूळ वतन ह्या घटने चे समरण नक्कीच निश्चित पणे होते.

ह्या पार गावच्या चकमकी मुळे इतरांना शाहू महाराजांचे आपल्या थोर पूर्वजांचे विचार – त्यांनी वेळो प्रसंगी दाखवलेली प्रत्यक्ष कृतीतून मर्यादा, साक्षात शाहू महाराजांच्या आचरणातून ही प्रकट होताना याची देही याची डोळा दिसून आली.

ह्या प्रसंग मुळे स्वराज्यातील अनेकांच्या मनातील महाराज तोतया असल्याचे व इतर अनेक किंतु परंतू ही दूर झाले.

पुढे काही दिवस नंतर शाहू महाराज आपल्या जमाव सह आपले निश्चित धेय्य पूर्ण करण्यास पुढे स्वराज्य च्या दिशेने मार्गस्थ झाले.

परंतू पारगाव चे हे प्रकरण फक्त पाटलाच्या मुलास अभयदान, गावचे इनाम, विजयाच्या आठवणीने फत्तेसिंग असे नामकरण एवढ्या वरच मिटले नाही. तर भविष्यातील एक मात्बर सरदाराच्या व एक तोलामोलाचा संस्थानाच्या उदययाचा पायाभरणी ठरले.

त्यास कारण असे की पाटलाच्या मुलाचे नामकरण एवढ्या वरच न थांबता, महाराजांनी ह्या मुलास स्वतःचे मानसपुत्र मानले. त्या मुलाचे पालकत्व ही महाराजांनी स्वतः कडे घेतले. त्यास स्वतःचे भोसले हे आडनाव दिले. हा मुलगा पुढे कायम शाहू महाराजां सोबत राहिला. विरुबाईसाहेबांनी अतिशय जीव लावत ह्या मुलाचा स्वतःच्या पुत्रवत संभाळ केला. महाराजांनी ह्या मुलास राजपुत्र चा मान दिला होता.

जसजसा हा पुत्र वयात आला तसतसा महाराजांनी त्याच्या वर स्वराज्य कार्याची धुरा ही सोपवली. एक प्रकारे हा महाराजांचा प्रतिनिधी च होता. अत्यांत महत्वाच्या ठिकाणी महाराज ह्यास नेहमी पुढे करत असे.

ह्याची दोन उदाहरणे म्हणजे निजाम व बाजीराव ह्यांच्या प्रथम भेटी दरम्यान फत्तेसिंग भोसले प्रत्यक्ष उपस्थित होते. पुढे वारणेच्या तह च्या वेळीस छत्रपती शंभाजी महाराज (कोल्हापूर गादी) यांस भेटीस आणण्यासाठी शाहू महाराजांनी फत्तेसिंग भोसले यांस पाठवले होते.

शाहू महाराजांनी ज्या प्रमाणे इतर सर्व सरदार ह्यांस हिंदुस्थान चे सुभे स्वराज्यात आणण्याचा एक भाग म्हणून वेगवेगळे मुलुख व प्रदेश स्वऱ्यांसाठी वाटून दिले होते. त्याचाच अनुक्रम म्हणून दक्षिण हिंदुस्थान ची मामलत फतेसिंग भोसले यांस दिली होती. व त्यांना भागनगरास (हैद्राबाद) मुख्य ठाणे करण्याचे निर्देश दिले गेले. त्याचा च एक भाग म्हणून इ.स.१७२५ व इ.स. १७२६ मध्ये शाहू महाराजांनी दक्षिण हिंदुस्तानात एका पाठोपाठ एक आशा लागोपाठ दोन मोठया मोहीमा काढून त्याचे मोहीम प्रमुख पद फतेसिंग भोसले यांस दिले होते. ह्या मोहिमेत कुल फौज व सर्व प्रमुख सरदार (बाजीराव पेशवे प्रथम यांच्या सह) फतेसिंग भोसलेंच्या अंतर्गत होते. पुढे १७३९ मध्ये रघुजी भोसलेंच्या मदतीने ह्यांनी दक्षिणेत मोहीम काढत मोठे यश मिळवत अर्काट च्या नवाबास कैद करत त्याचा सुभा ताब्यात घेत कावेरी नदी च्या काठी असलेला त्रिचीरापल्ली चा दुर्ग ही जिंकला. ह्या मोहमेत रघुजी भोसले ह्यांनी अतुलनीय पराक्रम केला होता.

शाहू महाराजांनी फत्तेसिंग भोसले ह्यांस जुन्नर ते सासवड च्या दरम्यान च्या मुलखातील ७२० गावांची पाटीलकी ही दिली होती. पुढे फत्तेसिंग भोसले ह्यांचा पुत्रवत संभाळ करणाऱ्या विरुबाईसाहेबांचा १७४० मध्ये मृत्यू झाल्यावर त्यांचा अंतविधी व इतर क्रियाकर्म फत्तेसिंग भोसले ह्यांनीच केले. व पुढे विरुबाईसाहेबांस खाजगी खर्चास दिली गेलेली अक्कलकोट ची जहागीर बाईसाहेबांच्या मृत्यू नतंर शाहू महाराजांनी फतेसिंग भोसले ह्यानांच दिली. व पुढे हे संस्थान फतेसिंग राजे भोसले ह्यांचे संस्थान म्हणून नावारूपास आले. छत्रपती शाहू महाराज ह्यांच्या मृत्यू च्या वेळी फत्तेसिंग भोसले ह्यांच्याकडे जवळ जवळ अदमासे पंचावन्न लाखांचा सरंजाम होता.

ह्या फत्तेसिंग राजेंची इतर वंशज(मूळ शाखेतून वेगळे झालेले) सातारा जिल्ह्यातील कुरले गावि स्थिरावले. व त्याच कारणाने आजही हे गाव राजाचे कुरले ह्या नावाने ओळखले जाते.

तर अशी ही मराठ्यांचे छत्रपती व त्यांच्या मानसपुत्राची सत्य घटनेवर आधारित इतिहासाची साक्ष असलेली कथा आज महाराजांच्या जयंती निमित्त मांडण्याचा इथे एक छोटा प्रयत्न केला.

ह्या परगावच्या घटने वरून व फत्तेसिंग राजे भोसले ह्यांस महाराजांनी दिलेल्या उज्जवल भविष्य वरून आपल्याला महाराजांच्या हृदयाचा एक वेगळा कप्पा उलगडताना दिसतो.

ह्या घटने वरून आपल्याला कळते की महाराजांचे व्यक्तिमत्त्व हे आभाळाएवढे विशाल होते. व आपल्या छायेस येणाऱ्या प्रत्येकास ते मोठ्या मनाने स्वतःच्या पंखाच्या सावलीत मायेने विसावा देत.

परंतू ह्या बदल्यात ते प्रत्येक कडून फक्त इमानी वागणुकी ची माफक अपेक्षा करत असे. जे अभय घेऊन उलटले त्यांची हयगय महाराजांनी कधीही केली नाही .

ह्याची इतिहासाच्या पानातील ठळक उदाहरणे म्हणजे
पंतप्रतिनिधिंचा कट उघडकीस आल्यावर डोळे काढण्याची दिलेली शिक्षा (ही शिक्षा आमलात आणली गेली नाही) कान्होजी भोसले चे बंड व त्या बद्दल त्याची राजधानी अजिंक्यतारा येथील आजन्म कैद, दमाजी थोरात चे प्रकरण व त्यास दिलेली पुरंदर व परळी च्या गडावरील मृत्यू पर्यंत ची कैद. ही आहेत

तर अशा प्रकारे कधी हळुवार मायेचा कोमल हात फिरवत तर कधी प्रसंगास कठोर होत त्यांनी प्रत्येक प्रकरण योग्य प्रकारे हाताळत सर्वांवर कृपेचे छत्र धरले.

त्यांच्या आदेश शिवाय स्वराज्याचे पान ही हालत नसत.
आपल्या मुत्सद्दी पणाने व योग्य ध्येय धोरणा द्वारे त्यांनी स्वराज्याचे अतिशय सामर्थ्य शाली साम्राज्यात रूपांतर केले. व दोन तृतीयांश तीन एवढा हिंदुस्थान स्वराज्यात आणला. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांस स्वराज्य विस्तारक हे पद अतिशय योग्य वाटते.

त्यांच्या काळात मराठे रुमशाम
(इस्तंबूल – टर्की) जिंकण्याचे ध्येय बाळगत होते. (मराठ्यांचा पत्र व्हव्हार ह्यास साक्षी आहे)त्यामुळे त्यांच्या मृत्यू नंतर मराठ्यांनी मोघलां बरोबर केलेल्या अहंमदिया करार अंतर्गत घेतलेली मुघल साम्राज्याच्या रक्षणाची जबाबदारी असो वा मराठ्यांनी सिंधू नदी पार करत अटके पार फडकवलेले झेंडे असो व महादजी शिंदेंनी मुघल बादशाह यास तनखा देऊन त्याच्या आडून कलेला साम्राज्य विस्तार व स्वतः च्या हिमतीवर पाहिलेला सशक्त असा यशस्वी उत्तरेचा कारभार असो.

हे सर्व हिंदू नृपती स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज ह्यांनी त्यांच्या हयातीत घालून दिलेल्या ध्येय धोरणांचे च परिपाक होते.

तर अशा ह्या आभाळा एवढे विशाल हृदय व कर्तृत्व असलेल्या हिंदू नृपती स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज ह्यांस त्यांच्या ३३८ व्या जयंती निमित्त मानाचा मुजरा.

लेखनसीमा
रोहित शिंदे

दि . १८ मे, २०२०

छायाचित्र
आंतरजाल

टीप :-

कृपया लेख पूर्ण वाचवा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स व्यक्त कराव्यात.

लेख आवडल्यास तो शेअर करून आपला अज्ञात इतिहास सर्वत्र पोहचवण्याचा कार्यात हातभार लावावा.

इतर लेख

  1. शंभाजी महाराजांच्या चोख मुलकी कारभाराचा पुरावा
  2. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सिंहगर्जना
  3. स्वराज्यकार्यास शिंदेंनी रणदेवतेस दिलेला पहिला निवेद्य
  4. इतिहासाच्या पानातील काही अज्ञात वीर शिंदे पुरुष
  5. शिवपुण्यतिथी ३४० वी

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*