समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

पेशवाईची इतिश्री - दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य - रजिस्टर

गडावर अडकून पडण्याचा व कलंतराने फितुरीचा ही संभाव्य धोका ओळखुन द्वितीय बाजीराव पेशवे ह्यांनी

दौलतराव शिंदे ह्यांनी आपला इमानी सेवक व आशिरगड चा किल्लेदार यशवंत राव लाड ह्याच्या मार्फत आशिरगड च्या किल्यावर आसरा घेण्याचा दिलेला सल्ला अमान्य केला.

व नाइलाजाने हतबल होत द्वितीय बाजीराव पेशव्यांनी
छावणीतील आपल्याला शेवट पर्यंत साथ देणाऱ्या पुरंदरे व विंचूरकर ह्या इमानी सरदारांसाठी माल्कम कडून अभयवचन घेत व ह्या सरदारांच्या जहागीरी कायम राखण्याच्या शब्दावर विश्वास ठेवत जॉन माल्कम ह्याच्या अटी मान्य करत शस्त्र खाली ठेवण्याचा निर्णय घेतला.
त्याच बरोबर त्यांनी पेशवे पदावरील व पर्यायाने म्हराठा साम्राज्य वरील आपला दावा ही सोडला.

आशा पद्धतीने गेली सात – आठ महिने चाललेले
३रे मराठा इंग्रज युद्ध ह्याचा शेवट होऊन , ३ जून १८१८ ह्या दिवशी मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवे – पंतप्रधान, द्वितीय बाजीराव पेशवे आशिरगड येथील धुळकोट येथे जॉन माल्कम ह्याच्या स्वाधिन होत इंग्रजांच्या छावणीत सपत्नीक दाखल झाले.

छत्रपती शाहू महाराज ह्यांच्या आशीर्वादाने

ज्या पेशव्यांनी गेल्या शतक भरात मराठ्यांच्या साम्राज्याच्या रथाचे सारथ्य करत अनेक पार्थ पराक्रमी सरदारांस हिंदुस्थानचे मैदान मोकळे करून दिले. त्याच पेशव्यांचे वंशज आज मात्र नियती समोर निरुत्तर जाहले…

पुढे इंग्रजांनी बाजीराव ह्यांस सालिना तनखवा मंजूर करत विठूर येथे ब्रम्हवर्तास पाठवले.

प्रसंग (मंत्रावेगळा)

पूर्व दिशा लक्ख उजळली होती. डेर्याच्या बाहेर खाजगी नोकर शागीर्द,खिजमतगार उभे होते. फौजेतले अधिकारी होते. अरब, पेंढारी,भिल्ल, गोसावी.

पेशव्यांनी आसपास पाहिलं. मुजऱ्यासाठी माना खाली झाल्या.दोन्ही हात जोडून बाजीरावसाहेबांनी साऱ्यांच्या मुजर्यांचा स्वीकार केला.मग छावणी कडे नजर टाकली. तंबू,राहुट्या,डेरे, जिथल्या तिथं होते.निघाला होता तो पेशवा. पुन्हा कधीच न परतण्यासाठी.

तोफांकडे न पाहताच बाजीराव समोरच्या पालखीत बसले.भोयांनी पालखी उचलली.पाठोपाठ पडदे सोडलेला शाही मेना निघाला. मेण्यात सरस्वतीबाई साहेब होत्या. आठ स्वार काय ते अखेरीस बरोबरीस होते.

पालखी डोंगराचा उतार उतरत होती.
समोर धुळकोट खेडं निवांत पहुडल होत.

क्रमाक्रमाने श्रीमंतांची पालखी व बाईसाहेबांचा शाही मेणा हताश अंतकरणाने इंग्रजी छावणी जवळ करत होता.

समाप्त….

इश्वरसत्ता विचित्र सारे दैवाने घडविले |
हरिशचंद्र आणि रामचंद्र नळ पांडवास रडविले |
फितूर करून सर्वांनी आपले राज्य मात्र बुडविले |

कवी प्रभाकर (समकालीन)

शब्दांकन
रोहित शिंदे

टीप

कृपया सदर पोस्ट व्यतिरिक्त इतर अन्यव्यर्थ,जातीवाचक व पोस्ट मधील इतिहास पुरुष संदर्भात व्यक्तिगत, खालच्या पातळीच्या टिप्पण करू नये.

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*