समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

प्रतिष्ठान बद्दल - दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य - रजिस्टर

दुर्ग मावळा प्रतिष्ठान आज पर्यन्त अनेकजण मोठ्या संख्येने विविध कार्यामार्फत सहभागी झाले आहेत. दुर्ग मावळा ची स्थापना हि छत्रपती शिवरायाच्या स्वराज्यच्या संकल्पनेतून कोणत्याही जाती धर्माच्या वादात अडकत न बसता फ़क़्त शिवकार्यासाठी साकार झालेली एक संघटना आहे. आज बऱ्याच संस्था अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे पण दुर्ग मावळा हि संस्था गेल्या वर्षभरापासून सामाजिक कार्य, दुर्ग भ्रमंती, इतिहास अभ्यास मोहिम, गडकिल्ले संवर्धन मोहिमा सातत्याने राबवत आहे.

संस्थेचे उद्दिष्ट खालील प्रमाणे आहेत :-

१) गड किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम करणे.

२) गडकिल्ले भ्रमण आणि गडकिल्ले इतिहास अभ्यास मोहीम आखणे.

३) ऐतिहासिक व्याख्यान आणि पोवाडाद्वारे इतिहास घरोघरी पोचवण्यासाठी प्रयत्न करणे.

४) गडकिल्ले संवर्धसाठी आणि इतिहास जपण्यासाठी जनजागृती करणे.

५) गडकिल्ल्यावर सण, उत्सव , पालखी मिरवणूक , शिवजयंती साजरी करणे.

६) रस्त्यावर चौकात असलेल्या शिवस्मारकाची वेळोवेळी स्वच्छता ठेवणे

७) अति दुर्गम भागांत शैक्षणिक ,सामाजिक शाळा ,आश्रमशाळा ,अनाथालय , बालवाडी अश्या ठिकाणी शैक्षणिक सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे.

८) अति दुर्गम भागांत बालके , विद्यार्थी , युवक , युवती , महिला , जेष्टानागरिक यांच्यासाठी आरोग्य शिबिर घेणे व आरोग्य विषयी जागरूकता निर्माण करणे

९) देशावर किंवा महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्तीग्रस्त आल्यास ( वादळ ,आग , महापूर ) यात सापडलेल्याना मदत करणे , त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सेवाभावाने काम करणे.

१०) गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे शैक्षणिक साहित्यांचे वाटप करणे , त्यांना अभ्यासिकेची सोय उपलब्धकरून देणे . मागास विद्यार्थ्यांना मदत करणे , त्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात मार्गदर्शन करणे.

११) पर्यावरण संरक्षण करणे त्यासाठी वृक्षारोपण करणे , पर्यावरण बाबत जागृती करणे.

१२) कुपोषण हटवण्या साठी पर्यन्त करणे , आहाराबाबत मार्गदर्शन करणे , मोफत अन्नछत्र चालवणे व सेवासुविधा पुरवणे.

१३) विशिष्ट रक्तगट च्या आवश्यकता असल्यास मदत करण्यासाठी पर्यन्त करणे.

१४) मोफत कायदेविषयक मार्गदर्शन करणे ,मानवी हक्क ,कर्तव्याबाबत जागृती करणे.

१५) रस्त्यांवरिल भटक्या प्राण्याना तसेच पशुपक्ष्यांना पाणी , निवारा , आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पर्यन्त करणे.

१६) कलेद्वारे विविध प्रकारे सामाजिक समस्यांचे महत्व पटवून देणे , त्यासाठी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, स्टेज शो , नाटक, आर्केस्ट्रा इ. आयोजित करून त्याद्वारे प्रबोधन करून प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे व कलावतांना संस्थेतर्फे प्रोत्साहन देणे.
– दुर्ग मावळा परिवार